निमसाखर : निमसाखर (ता. इंदापूर) व परिसरात अल्पपावसात रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी केलेली धूळपेर आणि त्यानंतर मध्यंतरी झालेल्या पावसामुळे शेतकºयांच्या शेतातील पिके डोलू लागली आहेत. मात्र, सध्या पाटबंधारे खात्याकडून शेतकºयांच्या उभ्या पिकांना पाण्याची गरज भासत असून, इतर पिकांसह ज्वारीसारखी पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील निमसाखर, निरवांगी, खोरोची, दगडवाडी, घोरपडवाडी यासह अन्य भागात अल्प पाऊस झाला आहे. पावसाने सुरुवातीपासूनच ओढ दिल्याने अल्प ओलिवर तर काही ठिकाणी पाणी उपलब्धतेनुसार, भिजवून, तर काही ठिकाणी शेतकºयांनी रब्बी हंगामातील धूळपेर (कोरडीवर पेर) केली. यानंतर अधूनमधून रिमझीम पाऊस तर पाटबंधारे खात्याच्या मध्यंतरी दिलेल्या आवर्तनामुळे कुठेतरी शेतामध्ये पिके डोलताना पहावयास मिळत आहे. यावेळी जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण सुदरीक म्हणाले की, सध्या रब्बीचे पहिले आवर्तन सुरु असून येत्या काही दिवसांत हे आवर्तन संपेल. यानंतर दुसरे आवर्तनावेळी शेतकºयांच्या शेतीला खात्याकडून पाणी उपलब्ध होईल. या आवर्तनावेळी पिण्यासाठी पहिले प्राधान्य देत उभ्या पिकांना पाणी दिले जाणार असल्याची माहिती सुदरीक यांनी दिली.