शिरूर : घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर असलेले कर्ज, भ्रष्टाचार पाहता तसेच या कारखान्याचे अध्यक्ष आपल्या नात्यातील व्यक्तीच्या व्यंकटेश कृपा या खासगी कारखान्याला करत असलेली मदत, देत असलेले प्रोत्साहन पाहता घोडगंगा हा कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर असून यास जबाबदार अध्यक्ष व संचालकांकडून शासनाने कर्जाची रक्कम वसूल करावी व त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री तसेच सहकार व साखर आयुक्तालयाकडे केल्याचे क्रांतीवीर प्रतिपठाणचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.
पाचंगे म्हणाले, घोडगंगा कारखान्यावर १८१ कोटी रूपयांचे कर्ज आहे २ङ्म१८-र०१९च्या अंदाजपत्रकात कारखान्याने ३७ कोटी ९४ लाख रुपयांची कर्जफेड केल्याचे नमूद केले आहे. म्हणजेच कारखान्यावर अद्याप १५०कोटी रुपयांचे कर्ज आहे . राज्यातील बंद पडलेल्या कारखान्यांचे उदाहरण पाहता घोडगंगा कारखाना पुढील वर्षी बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे .सहकारी साखर कारखाने बंद पाडायचे आणि तेच खाजगी म्हणून चालवायचे हे यांचे षडयंत्र आहे. घोडगंगाचे चेअरमन अॅड.अशोक पवार यांचे आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या व्यंकटेश कृपा साखर कारखान्याकडे जास्त लक्ष असून हा कारखाना उभारणीसाठी पीडीसीसी तसेच रायगड डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकांकडून घेण्यात आलेल्या एकूण ४३ कोटी रुपयांच्या कजार्साठी पवार यांची मालमत्ता तारण असल्याचे कागदपत्रावरून स्पष्ट झाले आहे .पवार यांच्या या भुमिकेमुळे घोडगंगा अडचणीत आल्याचे पाचंगे यांचे म्हणणे आहे. घोडगंगा व व्यंकटेशकृपा या दोन्ही कारखान्यांच्या व्यवहाराच्या चौकशी करावी तसेच नि:पक्ष चौकशी व्हावी यासाठी चेअरमन पवार व संचालकांनी राजीनामा द्यावा या पांचगे यांनी केली.पीडीसीसी व रायगड डिस्ट्रिक्ट बँकेने व्यंकटेश कृपा कारखान्याला नियमबाह्य कर्ज दिले असून या बँकांची, व्यंकटेशने बोगस शेअर्सद्वारे जमा केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या प्रकरणाची तसेच घोडगंगा कारखान्याच्या २०१० ते २०१८या कालावधीतील आर्थिक व्यवहारांची सीबीआय मार्फत चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे पाचंगे यांनी सांगितले .१८ डिसेंबरपर्यंत याची चौकशी करुन कारवाई करावी अन्यथा १८पासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा पाचंगे यांनी दिला आहे.