शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

पत्रावळी नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Published: May 11, 2015 6:17 AM

लग्न असो, नामकरण असो वा कोणताही कार्यक्रम असो; त्यासाठी पंगतीला पत्रावळ असणे आवश्यक आहेत. पूर्वी पानाच्या पत्रावळी, द्रोणाशिवाय पंगती होत नसत.

शिवप्रसाद डांगे, रहाटणीलग्न असो, नामकरण असो वा कोणताही कार्यक्रम असो; त्यासाठी पंगतीला पत्रावळ असणे आवश्यक आहेत. पूर्वी पानाच्या पत्रावळी, द्रोणाशिवाय पंगती होत नसत. मात्र, आता सर्वत्र प्लॅस्टिकच्या पत्रावळी व द्रोण कमी भावात उपलब्ध होत असल्याने आणि त्याची फॅशन असल्याने पानांपासून बनविलेल्या पत्रावळी-द्रोण कालबाह्य होत असल्याचे चित्र ग्रामीण भागासह शहरातही दिसून येत आहे. मोहाच्या व पळसाच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण बनवल्या जात. या पत्रावळीत केलेले जेवण लोकांना स्वादिष्ट व चवदार वाटायचे. सकाळी जंगलात जाऊन पाने तोडून आणायची आणि मग दुपारी त्यापासून कुटुंबातील लहान-मोठ्यांना पत्रावळी बनविण्याचे काम मिळायचे. एक व्यक्ती १०० ते २०० पत्रावळी दिवसभर बनवीत असे. त्यापासून पैसा कमवायचे, मात्र यासाठी मेहनत खूप घ्यावी लागत असे. त्यासाठी वेळसुद्धा भरपूर लागायचा. पत्रावळी बनवून अनेक कुटुंबे यावर उदरनिर्वाह चालवीत असत. पत्रावळी बनवून थेट शहरातील बाजारात विकल्या जात असत. त्यामुळे अनेक कुटुंबांना रोजगार मिळत असे. आता यंत्राद्वारे प्लॅस्टिकच्या पत्रावळी व द्रोण अत्यंत कमी वेळात, कमी किमतीत, तसेच विविध रंगांत उपलब्ध होतात. कागद व प्लॅस्टिकच्या पर्यायात उपलब्ध होत असल्याने यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पत्रावळी बनवून आपला प्रपंच चालविणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर काहींना इतर व्यवसायांकडे वळावे लागले आहे. तरीही आज शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातसुद्धा पानाच्या पत्रावळी दिसून येत नाही. त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शालू, पैठणीलाच महिलांची पसंती१‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा’ पदरावरच्या जरतारीच्या नक्षीदार मोराने मोहित झालेल्या कन्येने आपल्या आईकडे पैठणी नेसण्याचा हट्ट धरल्याचे लडिवाळ चित्र उभे करणाऱ्या या गीताने अनेक वर्षे रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. या अवीट गोडीच्या गीताप्रमाणे पारंपरिक शालू व पैठणीचा रुबाब अद्यापही लग्नसोहळ्यात कायम आहे. बदलत्या युगात कितीही नवनवीन व्हरायटी बाजारात येत असल्या, तरी दागिने, कपडे यात पारंपरिकतेलाच महिलांची पसंती आहे. ‘जुनं ते सोनं’ची प्रचिती अनेक समारंभांत दिसून येत आहे. २वधूसाठी पैठणीच हवी, असा हट्ट आजही अनेकजणी धरतात. पैठणी महाराष्ट्रातील भरजरी वस्त्रकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. पैठणी गर्भरेशमी असून, तिचा पदर संपूर्ण जरीचा असतो. काठ रुंद व ठसठसीत, वेलबुट्टीचे असतात. पैठणीच्या संपूर्ण काठावर दोन्ही बाजूंनी सारखीच वेलबुट्टी दिसणे, हे तिचे खास वैशिष्ट्य मानले जाते. विवाहप्रसंगी नववधूचा शृंगार गृहलक्ष्मीचा साज हीच पैठणीची पारंपरिक ओळख आहे. पैठणीच्या वीणेत व वाराणसीच्या शालूत बरेच साम्य आहे.विणकर रेशमी पोताखाली हव्या असलेल्या नक्षीकामाचे कागद ठेवून त्यानुसार काम करीत.