भोर तालुक्यात मागील आठवडाभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर-उतारावरील दगडमाती कोर्ले-जांभुळवाडी ते रायरेश्वर रस्ता व ओहळी मार्गे रायरेश्वर रस्त्यावर आल्याने मोठ मोठ्या दरडी पडून रस्ता बंद झाला आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. पावसाचे पाणी रस्त्यावरून वेगाने वाहत असल्यामुळे नागरिकांनी त्यामुळे रायरेश्वर किल्ल्यावरील नागरिकांना वाई मार्गाचा वापर करावा लागत आहे.
अनेक पर्यटकांनाही किल्ल्यावर जाण्यास मोठी अडचण होत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर सुमारे ४० जंगम कुटुंबे राहतात. किल्ल्यावरील शिवायलाच्या दर्शनासाठी अनेक शिवभक्त, भाविक आणि पर्यटक नेहमीच येत असतात. मात्र रस्ता दरडी पडून खराब झाल्यामुळे वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे सर्वांचीच मोठी अडचण झाली आहे. रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
---
फोटो ओळी : २६ भोर किल्ल्याकडे जाणारे रस्ते बंद.
फोटो क्रमांक : रायारेश्वर किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या दरडी.