पुणे : स्वाईन फ्लूचा प्रसार वाढत असून नाशिक, पुण्यात स्वाईन फ्लूच्या संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत अाहे. जून, जुलै हे महिने स्वाईन फ्लूच्या विषाणूंच्या प्रसारासाठी पाेषक असतात. स्वाईन फ्लूचा विषाणू हवेतून पसरत असताे, त्यामुळे काळजी घेणे अावश्यक अाहे. स्वाईन फ्लूच्या विषाणूपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी.
1) सातत्याने खाेकला, ताप, अंगदुखी, घसा दुखत असल्यास तपासणी करणे अावश्यक अाहे.
2) एखाद्याला स्वाईन फ्लूची लक्षणे असल्यास त्यांनी शिंकताना तसेच खाेकताना काळजी घेणे अावश्यक अाहे.
3) गर्दीच्या ठिकाणी जाताना शक्यताे मास्कचा वापर करावा. किंवा स्वच्छ धुतलेला रुमाला नाकाला बांधावा
4) स्वाईन फ्लूचा विषाणू हवेतून पसरताे तसेच स्वाईन फ्लू असलेली व्यक्ती खाेकल्यास त्याचे विषाणू इतरत्र पसरत असतात. त्यामुळे जेवण्याअाधी स्वच्छ हात धुणे अावश्यक अाहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जाऊन अाल्यानंतरही हात स्वच्छ धुवावेत.
5) गराेदर महिला तसेच लहान मुलांना स्वाईन फ्लूचा संसर्ग हाेण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे अाहे.