उद्धव ठाकरेंना वसुली साठी माणूस हवा होता, 50 कोटींची वसुली करणारा जुना शिवसैनिक हवा होता म्हणून वाझेना परत आणलं गेलं असा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. या प्रकरणात सेनेवर तोफ डागतानाच या प्रकरणी गृहमंत्र्यांचा हलगर्जी पणा नसल्याचं ही सोमैया म्हणाले आहेत..दरम्यान राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना का निलंबित केले होते असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. वाझे हा राज्य सरकार चा विशेष माणूस असल्याचे दिसत आहे असाही आरोप सोमैया`यांनी केला .
सोमैया म्हणाले , " प्रकरणात साध्या एक एपीआय साठी उद्धव ठाकरे कमिटी तयार करतात. ६ जूनला त्याचे निलंबन रद्द केलं. शरद पवारांनी गृहमंत्री असताना त्यांना निलंबित का केलं होत. त्यानंतर २००७ मध्ये राष्ट्रवादीचे गृहमंत्री त्यांचा राजीनामाही स्वीकारत नाहीत. वाझे प्रकरणात आघाडी सरकार त्यांच्या पाठीशी दिसत आहे. त्यामुळे वाझे हा राज्य सरकारचा विशेष माणूस असल्याचे सिद्ध होत आहे. असा आरोप किरीट सोमैय्या यांनी राज्य सरकारवर केला आहे"
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमैया यांनी ससून रुग्णालयात लसीकरण केंद्रास भेट दिली . यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.सोमैय्या म्हणाले, "आताचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना काय दिसले की त्यांनी वाझेंना परत घेतलं? शरद पवारांनी त्यांना निलंबित केलं होतं. मग आता हे का परत घेत आहेत. या प्रकरणात गृहमंत्र्यांचा हलगर्जीपणा नाही तर उद्धव ठाकरेंना वसुली करायला माणूस हवा आहे. सरकार माफियागिरी करतंय. असा टोलाही त्यांनी यावेळी बजावला. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी जनतेला उत्तर द्यावे असंही सोमैया म्हणाले.
एखादा एपीआय क्राईम ब्रांच ची गाडी घेऊन फिरतो यावरूनच वझे हा सरकार चा महत्वाचा माणूस आहे हे सिद्ध होते आहे असाही आरोप सोमैयानी केला. दरम्यान पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांची हकालपट्टी झाली असंही ते म्हणाले.