आम्ही ८० वर्षाच्या ' योध्या' सोबत बारामतीत लागले फलक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 02:54 PM2019-11-23T14:54:54+5:302019-11-23T14:56:19+5:30
एकेकाळी सत्ता आल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष होणाऱ्या बारामतीत भयाण शांतता आहे.
बारामती : अजित पवारांच्या बंडोखोरीवर बारामतीकरांनी मात्र संयमीत प्रतिक्रिया देतशहरात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या फोटोसह 'आम्ही ८० वर्षाच्या 'योध्या' सोबत..! ' असे फलक लावले आहेत. २४ ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वात मोठी उलथापालथ राज्याच्या राजकारणात पाहायला मिळाली आहे. कोणत्याहीपक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. यानंतर शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या ३ पक्षांनी एकत्र येऊन ' महाविकास ' आघाडीच्या मार्फत राज्यात सत्ता स्थापन करण्याचं ठरवलं. मात्र या सर्व घडामोडींवर मात करत, शनिवारी सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे बारामतीचे आमदार अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयाचे राज्यात साहजिकच पडसाद पाहायला मिळाले. बारामतीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तसेच सर्वसामान्य बारामतीकरांसाठी हा मोठा धक्का होता. एकेकाळी सत्ता आल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष होणाऱ्या बारामतीत भयान शांतता आहे.बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा समर्थनार्थ पोस्टर्स झळकली आहेत. आम्ही, ८० वर्षांच्या योद्ध्यासोबत ! असा संदेश लिहत बारामतीकरांनी शरद पवार यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. या सर्वप्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवारांची विधीमंडळ नेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे. अजित पवारांच्या या बंडखोरीचा स्थानिक राजकारणावर देखील मोठा