पुणे : भाजपा महाराष्ट्रात विरोधी पक्षात असतानाही राज्यसभा आणि विधान परिषद अशा दोनही निवडणुकांमध्ये त्यांचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. भाजपाच्या या विजयानंतर शिवसेनेचे खंदे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांसोबत नॉट रिचेबल झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नाराज आमदार गुजरातच्या सूरतमध्ये असून ते नाराज असल्याचं आता उघड झालं आहे
मात्र एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत यासंदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल मत व्यक्त केलं आहे. आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान आहे. त्यानिमित्ताने रोहित पवारआळंदीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, मी देखील बातम्यांच्या माध्यमातून हे पाहत आहे. एकनाथ शिंदे हे रीचेबल झाल्यावर ते त्यांची भूमिका मांडतील. वारकरी संप्रदायात जोडण्याला महत्त्व आहे. आम्ही जोडणारे लोक आहे.काही जण तोडण्याचा प्रयत्न करत आहे बघुया काय होतय..अस यावेळी रोहित पवार म्हणाले.