पुणे : राज्यात गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच शिंदे गटाच्या काही नेत्यांकडून अजितदादांना मुख्यमंत्र्यांसोबत येण्याची ऑफर दिली जात आहे. या राजकीय घडामोडीवर नाना पटोले यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीत नेमकं काय चाललं आहे? दुसऱ्यांच्या घरात पाहण्याची आम्हाला सवय नाही. त्यामुळे तिकडे काय चालल आहे याकडे आमचं लक्ष नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
पटोले म्हणाले, मित्र पक्षावर आम्ही कधीही अविश्वास व्यक्त केला नाही. आमची भूमिका एकच आहे जो कोणी बीजेपी विरोधात आणि संविधान वाचवण्यासाठी लढत असेल. त्याच्यासोबत शेवटपर्यंत उभा राहणे. कोणाला कुठे जायचं, कुठल्या पक्षात जायचं. त्याचे आम्हाला काही सोयर सुतक नाही. आमचं त्याच्याकडे कुठलही लक्ष नाही. कालच्या सभेत प्रत्येक पक्षाचे दोन जण बोलणार आहेत. आधीपासूनच ठरलेले होते. त्यानुसार राष्ट्रवादीकडून दोन नावे आली होती. राष्ट्रवादीत नेमकं काय चाललं आहे? दुसऱ्यांच्या घरात पाहण्याची आम्हाला सवय नाही. त्यामुळे तिकडे काय चालल आहे याकडे आमचं लक्ष नाही. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना पुढील १५ दिवसात महाराष्ट्रातील राजकारणात दोन मोठे स्फोट होणार असल्याचे भाकीत केले होते. त्यावरून आंबेडकर यांना टोला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर कधीपासून भविष्यकार झाले मला माहित नाही असं ते म्हणाले आहेत.
केंद्रसरकार विरोधी आंदोलन
नरेंद्र मोदी जवाब दो हे आंदोलन महाराष्ट्रात घेऊन आलो आहे. सत्यपाल मलिक यांनी जे विधान केला आहे. त्याबद्दल नरेंद्र मोदींना भूमिका मांडावी लागेल. तुमची 56 इंची हिम्मत या देशाला जाणून घ्यायची आहे. अदानी बद्दल तुम्हाला उत्तर द्यावे लागेल असे त्यांनी संघितले आहे.
महाराष्ट्र भूषण उष्माघात दुर्घटना
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भारतरत्न मिळाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका होती. अमित शहा ,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यांच्यासाठी एअर कंडिशन मंडप टाकला जातो. तर सामान्य जनता एवढ्या संख्येने येणार असूनही आणि त्यांच्याच पैशाने हा कार्यक्रम होणार होता. हा शासकीय कार्यक्रम होता. तरीही जनतेसाठी मंडप का नाही टाकला असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे.
माणुसकी नसलेल हे सरकार आहे
सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता जनतेतून होत आहे. गुन्हा दाखल झाला पाहिजे. सामान्य जनतेला तडफडून मारण्याचा पाप सरकार करत आहे. या सरकारला थोडी जरी लाज असेल तर तातडीने राजीनामा द्यावा. ही मागणी काँग्रेसची असल्याचे त्यांनी सांगितले आहे.