काटेवाडी : मुंबई येथे होणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीसाठी काटेवाडी ग्रामस्थ मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. बुधवारी(दि ५) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील बैठक होणार आहे. मात्र, काटेवाडीकरांनी ‘अजितदादांवर मोहर उमटविली आहे. त्यामुळे पवार कुंटूबियाचे गाव म्हणुन ओळख असलेल्या काटेवाडी गावाची साथ उपमुख्यमंत्री अजित पवारांना मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काटेवाडी हे पवार कुंटूबियाचे गाव आहे. या परिसरात पवार यांची शेती आणि घर आहे. सन २००० पुर्वी काटेवाडी परिसरात पवार कुंटूबियाचे वास्तव होते. दिवाळी सण सुद्धा काटेवाडी च्या घरीच साजरा होत असे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार व पवार कुंटूबियाची यांची राजकीय कारकिर्द ची मुहर्तमेड काटेवाडी तून सुरू झाली. १९९५-९६ च्या दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार शारदानगर येथील गोंविदबाग निवासस्थानी वास्तव्याला आले. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वास्तव्य काटेवाडीतच होते. त्यांच्या मातोश्री आशाताई पवार सध्या काटेवाडीतच ‘पवार फार्म’ येथे वास्तव्याला आहेत. अजित पवारांची राजकीय कारकिर्द काटेवाडीलगतच्या छत्रपती कारखान्याच्या संचालक पदापासुन उपमुख्यमंत्रीपदावर्यंत पोहचली. आजही त्यांची काटेवाडी गावाची नाळ कायम जुळून राहिली आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी स्वत: लक्ष घालत काटेवाडीची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्याच प्रयत्नामुळे काटेवाडीने राज्यात स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक मिळविला.
त्यामुळे ज्येष्ठांपासुन युवक महिला अजित पवार यांच्या पाठिशी असल्याचे चित्र आहे. मागील दोन दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर अनेक युवकांचा जथ्था मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर उद्या बुधवार (दि ५ ) होणाºया अजित पवारच्या मुंबईच्या मेळाव्यासाठी काटेवाडी कर रवाना होणार आहेत.
आम्ही फक्त... दादाचे च भक्त..
उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काटेवाडी करानी फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. एकच वादा... अजितदादा... आम्ही फक्त... दादाचे च भक्त... अशा घोषणा देत आंनदाने एकमेकाना पेढे व लाडू भरवुन आपला आंनद द्विगुणीत केला. सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काटेवाडी कर दादाच्या समवेत कायम राहू , ‘दादा ’च आमचा पक्ष, दादाच आमचा ध्यास, त्यामुळे दादासाठी कायपण, आजपण, उद्यापण, अशा प्रतिक्रिया देत आंनद व्यक्त केला.