शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

"विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याला आपणच जबाबदार.." अपराधी भावनेतून शिक्षकाचं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 10:58 AM

विद्यार्थ्यांकडून शौचालय साफ करून घेतल्याने विद्यार्थी शाळा सोडून गेल्याची अपराधीपणाची भावना शिक्षकाच्या मनात होती

किरण शिंदे 

पुणे : आपल्या शाळेतील 10 पैकी नऊ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने याला आपणच कारणीभूत असल्याची अपराधीपणाची भावना मनात दाटल्याने जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने टोकाचे पाऊल उचललं. या शिक्षकाने वर्गातच विषारी औषध प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला. दौंड तालुक्यातील होले वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. अरविंद देवकर असं या शिक्षकाचं नाव आहे.

टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी अरविंद देवकर यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये त्यांनी आयुष्य संपवण्यामागील कारणे सविस्तर लिहून ठेवले आहेत..या चिठ्ठीत त्यांनी लिहिलंय कि, जून महिन्यात सुरुवातीचे तेरा दिवस मी विद्यार्थ्यांना अध्यापन करू शकलो नाही कारण, एक शिक्षकी शाळेत काम करत असताना मी बावरून गेलो होतो. विद्यार्थ्यांकडून लेखन विद्यार्थ्यांशी ओळख, गप्पा, गाणी, गोष्टी मैदान साफसफाई या कामातच वेळ गेला. त्यात विद्यार्थ्यांकडून मी आणि विद्यार्थी शौचालय साफ करून घेणे ही गोष्ट पालकांना खटकली. त्यातच शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर कणकण आल्याने जेवणाच्या सुट्टीमध्ये गोळी घेऊन आराम करत होतो. यादरम्यान एका विद्यार्थ्याला दुखापत झाली. माझ्या या सर्व चुकांमुळे शाळेतील दहा विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थ्यांनी खालच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर शाळेत एकच पहिलीतील विद्यार्थी राहिला. या घटनेनंतर मी पालक वर्गाची माफी मागून, विनंती करून फक्त एकच संधी द्या अशी विनवणी केली होती. मात्र मला कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अपराधीपणाची भावना माझ्या मनात खोलवर रुजली. विद्यार्थी शाळा सोडून जाण्यास सर्वस्वी मीच जबाबदार असल्याची भावना खोलवर रुजल्याने शिक्षण मंदिरात देहाचा त्याग करण्याचे ठरवले, यास कोणासही जबाबदार धरू नये.

आतापर्यंत 19 वर्ष सेवा झाल्याचेही अरविंद देवकर यांनी चिट्ठीत नमूद केले. यापूर्वीच्या शाळेत चांगले सहकारी शिक्षक लाभल्याने सेवा चांगली झाली. मात्र खोली वस्ती येथील शाळा एक शिक्षकी असल्याने कामाच्या गोंधळात मी सुरुवातीला बावरून गेलो होतो. त्यामुळे मला पाहिजे त्या पद्धतीने पालक वर्गाची मने जिंकता आली नाहीत. असं त्यांनी चिठ्ठीत नमूद केलं. तीन ऑगस्टला त्यांनी प्राथमिक शाळेच्या वर्गातच विषारी औषध प्राशन केलं. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान आठ ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीTeacherशिक्षकSchoolशाळाEducationशिक्षणDeathमृत्यू