शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

फॅशन स्ट्रीट मधील व्यापाऱ्यांसाठी आर्थिक मदतीची मोहीम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 7:04 PM

कॅम्प भागातील सामाजिक संघटनानी घेतला पुढाकार

ठळक मुद्देफॅशन स्ट्रीटमधील व्यापारी वर्गाचे पुणेकरांना आर्थिक मदतीचे आवाहन

गेल्या दहा पंधरा वर्षांपासून आम्ही फॅशन स्ट्रीट मध्ये व्यवसाय करत होतो. यावरच आमच्या गरजा भागवल्या जात होत्या. आगीत पूर्ण दुकानच जळून खाक झाले आहे. आमचा दुसरा कुठलाही व्यवसाय नाही. आता आम्ही रस्त्यावर आलो आहोत. सरकार आणि पुणेकरांकडून मदतीची अपेक्षा आहे. अशी कळकळीची विनंती येथील व्यावसायीकांनी केली आहे.

फॅशन स्ट्रीट येथे लागलेल्या आगीत चारशे पेक्षा जास्त दुकान जळून खाक झाली आहेत. आगीत दुकानदारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. फॅशन स्ट्रीटच्या व्यापारी वर्ग आणि त्याभागातील सामाजिक संघटनांकडून नागरिकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने व्यापाऱ्यांशी संवाद साधला. अशा वेळी आपले दुःख व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले नाहीत. एक मदतीची आर्त हाक त्यांच्या बोलण्यातून दिसून आली. सर्वकाही गमावले पोटापाण्याचा प्रश्न कोण सोडवणार. या भावनेतून त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.  

आमच्या हातात काहीच उरले नाही 

पुण्याचे खास आकर्षण असणाऱ्या फॅशन स्ट्रीट मध्ये काल रात्री ११ च्या सुमारास भीषण आग लागली. स्ट्रीट मध्ये सर्वाधिक कपड्यांची दुकाने असल्याने आगीचा भडका उडण्यास वेळ लागला नाही. रात्रीच्या वेळी पूर्ण फॅशन स्ट्रीट बंद झाले होते. सर्व व्यापारी आपली दुकाने बंद करून घरी गेले होते. आग लागल्यानंतर व्यापाऱ्यांना फोन येऊ लागले. त्याच क्षणी त्यांनी फॅशन स्ट्रीट कडे धाव घेतल्याचे सांगितले. आगीत सर्व काही जळताना पाहून डोळ्यातून अश्रूही फुटत नव्हते. सर्व शरीर स्तब्ध झाले होते. आता जगण्यात अर्थ राहिला नाही. या आगीपूढे आपले काहीच उरणार नाही. असेच आम्हाला वाटू लागले होते. प्रत्यक्षात तेच घडले असून आमच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याची व्यथा त्यांनी यावेळी मांडली.

दहा मिनिटाच्या अंतरावर आहे अग्निशमन दलाचे कार्यालय

फॅशन स्ट्रीटपासून दहा मिनिटांच्या अंतरावर अग्निशमन दलाचे कार्यालय आहे. तरीही आग लागल्यानंतर ते अर्ध्या पाऊण तासाने घटनास्थळी पोहोचले. तसेच फॅशन स्ट्रीटची जागा खूप मोठी असल्याने सुरुवातीपासूनच जास्तीत जास्त गाड्या दाखल होणे गरजेचे होते. पण उशिरा येऊनही एकच गाडी सुरुवातीला आली होती. स्ट्रीटमध्ये चिंचोळ्या गल्ल्यांचे प्रमाण जास्त असल्याने त्या गाडयांना आतमध्ये जाण्यासही अडचणी निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले .

व्यापारी रोहन धुपत म्हणाले, दहा वर्षांपासून माझे फॅशन स्ट्रीटमध्ये दुकान आहे. ट्रॅक पँट, बर्मुडा असे कपडे मी विकत होतो. रमझानच्या निमित्ताने ८ लाखांचा माल  भरून ठेवला होता. सद्यस्थितीत हातात काहीच उरले नाही. अशा परिस्थितीत काय करावे आम्हाला सुचत नाही. आमच्या वतीने येथील संघटना मदत मागत आहेत. सरकारकडूनही पण आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

माझ्या बरोबर दुकानात आठ कामगार कार्यरत आहेत. या आगीत आमचे संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. आम्ही मागणीनुसार माल भरून ठेवतो. त्यामुळे अतिरिक्त काही भरून ठेवले नाही. माझ्यासहित कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे या फॅशन स्ट्रीट मध्ये असंख्य कामगार आहेत. कोणीतरी मदत करावी याच आशेवर आम्ही आहोत.                                                                                                                                                   असिफ बंदगी

फॅशन स्ट्रीट १९९७ साली सुरु झाले. तेंव्हापासून आमचे येथे दुकान आहे. जुने असल्याने असंख्य ग्राहक ओळखीचे झाले होते. आवडीने दुकानात कपडे घेण्यासाठी येत होते. पण आता आमचे जगणे अवघड झाल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसत आहे. जवळपास दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई मिळणे सध्यातरी अवघड वाटत आहे. कोरोनामुळे अनेक अडचणींना सामोरे जाऊन व्यवसाय चालू झाला होता. आता पुन्हा व्यवसाय उभे करणे आमच्यासाठी आव्हानच असणार आहे.                                                                                                                                                    शहानू शेख

सामाजिक संघटनेकडून पुणेकरांना आर्थिक मदतीचे आवाहन 

कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटमध्ये लागलेल्या भयानक आगीत दुकानदारांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. त्या भागातील जमत ये इस्लामी हिंद या सामाजिक संघटनेकडून अशा संकटकाळी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. पुणेकरांनी मदतीचा हात पुढे करून ऑनलाईन पेच्या माध्यमातून आर्थिक मदत करावी. बँक खाते नंबर :- 321701010037573आयएफएससी कोड :- UBINO532177UNION BANK OF INDIA CAMP BRANCH 

टॅग्स :PuneपुणेfashionफॅशनPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका