'आम्ही अजितदादांबरोबर...', बारामतीत फटाक्यांची आतिषबाजी; मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आनंदोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 03:13 PM2023-07-02T15:13:22+5:302023-07-02T15:13:55+5:30

दादा ज्या पक्षात राहतील, प्रवेश करतील, तो पक्ष मोठा होऊन वाढेल. आम्ही अजितदादांबरोबर राहणार

'We are with Ajitdad...', fireworks in Baramati; Celebrations after swearing in as minister | 'आम्ही अजितदादांबरोबर...', बारामतीत फटाक्यांची आतिषबाजी; मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आनंदोत्सव

'आम्ही अजितदादांबरोबर...', बारामतीत फटाक्यांची आतिषबाजी; मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आनंदोत्सव

googlenewsNext

बारामती: अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बारामतीकरांनी फटाक्यांची आताषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.ऐन आषाढ महिन्यात दिवाळीचा अनुभव नागरीकांनी घेतला. सुरवातीला अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त पसरल्यानंतर पक्ष कार्यालय परीसरात सन्नाटा पसरला होता. मात्र,नागरीकांना या निर्णयाचे जोरदार स्वागत केले.फटाक्यांची आताषबाजी करीत आपला आनंद व्यक्त केला.सुमारे अर्ध्या तासाुिन अधिक काळ सुरु असणाऱ्या फटाक्यांची फटकेबाजी अद्याप सुरुच आहे.

याबाबत माजी नगरसेवक निलेश इंगुले यांनी सांगितले कि, अजितदादांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने आम्हा बारामतीकरांनी मोठा आनंद झाला आहे. दादा पुन्हा उपमुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे बारामतीच नव्हे पुर्ण महाराष्ट्राला चांगले दिवस येतील. सर्वांचा विकास होईल. दादा ज्या पक्षात राहतील, प्रवेश करतील,तो पक्ष मोठा होऊन वाढेल. आम्ही अजितदादां बरोबर आहोत.

अजित पवार यांनी थेट मागील महिन्यात विरोधी पक्षनेते पदावरुन मुक्त करण्याची मागणी केली. मला पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी पद देण्याची मागणी केली होती. त्यानंतर थेट आज अजित पवार यांच्यासह पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार बाहेर पडल्याचे वृत्त बाहेर आले. अजित पवार यांच्यासमवेत नेमक्या किती आमदारांचा गट बाहेर पडला, तसेच अजितदादा नेमक्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.  अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यास बारामतीच्या राजकारणात मोठे फेरबदल होणार आहेत. कारण सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादीसाठी सबकुछ ‘अजितदादा’ आहेत. पक्षावर त्यांचीच एकहाती पकड आहे.

Web Title: 'We are with Ajitdad...', fireworks in Baramati; Celebrations after swearing in as minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.