शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

हम दोनो एकदम जुडवाँ.....पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी ‘सवाई’त उलगडले शिवहरीचे मैत्रीपर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 5:43 PM

ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी गेल्या सहा दशकांहून अधिक काळ पं. शिवकुमार शर्मा यांच्याशी ‘शिवहरी’च्या माध्यमातून जुळलेल्या मैत्रीबंधाचे अद्वितीय स्वरपर्व ‘सवाई’त उलगडले.

ठळक मुद्देलगता है हम दोनो एकही पेटसे बाहर आए है : हरिप्रसाद चौरसिया'धरती, आकाश, चंद्रमा, पहाडी यांच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाला काही महत्त्व नाही'

पुणे : आम्हाला स्वत: लाच कळत नाही ही कशाप्रकारची मैत्री आहे.. मात्र अशी मैत्री कधी पाहिली नाही ना कधी ऐकली...१९५४ पासून सुरू झालेली ही मैत्री कधी संपेल माहीत नाही.. जेव्हा कधी भेटतो तेव्हा भांडणालाच सुरूवात होते.. लगता है हम दोनो एकही पेटसे बाहर आए है, एकदम 'जुडवाँ'....अशा शब्दातं ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी गेल्या सहा दशकांहून अधिक काळ पं. शिवकुमार शर्मा यांच्याशी ‘शिवहरी’च्या माध्यमातून जुळलेल्या मैत्रीबंधाचे अद्वितीय स्वरपर्व उलगडले. पण...आता संगीत देणे बंद केले आहे. अनारकली, मुघले आझम चा काळ संपला. आता तसे विषय बनत नाहीत. त्यामुळे विश्रांती घेतली आहे..लोकांना जे करायच ते करून देत. चांगले विषय मिळाले तर परत सुरूवात करू, असे चौरसिया यांनी सांगितले. आमच्या मैत्रीचा प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असाच आहे. ज्यावेळी मुंबईमध्ये आलो तेव्हा चित्रपटाशी आमचा दूरान्वये संबंध नव्हता. शास्त्रीय संगीताचा रियाज करणे आणि गुरू अन्नपूर्णा यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेणे इतकेच आम्ही करीत होतो. चित्रपटांचा विचार केला तर आम्हाला धक्के मारून बाहेर काढले जात होते..पण नंतर आमचे संगीत लोकांना आवडायला लागले. आम्ही ज्या पद्धतीने संगीताचा विचार करायचो उदा: ये कहा आ गये हम’ हे गाणे ऐकल्यानंतर यांना संगीत का करायला देऊ नये.जर्मन, फ्रेंच या व्यक्ती देखील माणसेच असतात, संगीत पण तसेच आहे. शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त जे आधुनिक, व्यावसायिक आणि बॉलिवूड संगीत आहे ते लोकांच्या आत्म्यामध्ये  आहे. नेहमी लोक ही गाणी गुणगुणत असतात. मग का नाही  त्यांच्या हदयापर्यंत पोहोचून त्यांचा आशिर्वाद घेऊ, भगवानची कृपा झाली. नशीबानेही साथ दिली आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासमवेत काम केले. एक छान ट्यूनिंग आमच्यात जुळले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.शिवहरी यांचे संगीत पुन्हा ऐकायला मिळणार का? तर पंडितजींनी तत्काळ होकार दिला. थोडासा ब्रेक झाला आहे, झटपट पैसे मिळावे अशी लालच अनेकांना असते. आम्हाला पण आहे. पण काम करीत आहोत नव्या पिढीला काय देत आहोत, काय संदेश देत आहोत हे महत्वाचे आहे. आत्ताच्या चित्रपटात पिढीला साधे डायलॉग व्यवस्थित म्हणता येत नाहीत. इंग्रजीचा वापर वाढला आहे. फक्त त्यांना पैसे मिळवायचे आहेत्, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

संगीतात रिमिक्सचे ‘प्रदूषण’ रिमिक्सच्या जमान्यात झटपट प्रसिध्दीच्या मागे तरूण पिढी लागली आहे, एक काळ होता की संगीतासाठी साधना केली जायची मात्र आज ती साधनाच हरवली आहे, या प्रश्नाला पंडितजींनी दुजोरा दिला. आपण खूप आधुनिक आहोत, असे दाखविले जात आहे. संगीतात जशी घाणेरडी हवा आल्याने वातावरण प्रदूषित होते तसे आज काहीसे झाले आहे. मुलांचा मेंदू आणि विचार करण्याची क्षमता लुप्त तर होणार नाही ना? अशी भीती वाटते. मुलांना एकदा सांगितले की लक्षात यायचे पण आता त्यांच्या मेंदूत काहीच शिरत नाही. धरती, आकाश, चंद्रमा, पहाडी यांच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाला काही महत्त्व नाही. 

टॅग्स :Puneपुणे