आम्ही ‘ पुणेकर ’ निर्दोष ! घटलेल्या मतदानाला '' ते'' च जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 01:13 PM2019-04-25T13:13:44+5:302019-04-25T13:19:52+5:30

पुणेकर मतदानाला उत्साहाने बाहेर पडले नाहीत, याचे कारण उमेदवारांबद्दल पुुणेकरांमध्ये असलेली नापसंती हे असू शकते.

We 'clear ' innocent! Due to the reduced voting ''it '' is responsiblity | आम्ही ‘ पुणेकर ’ निर्दोष ! घटलेल्या मतदानाला '' ते'' च जबाबदार

आम्ही ‘ पुणेकर ’ निर्दोष ! घटलेल्या मतदानाला '' ते'' च जबाबदार

Next
ठळक मुद्देमतदारांना उत्साह वाटावे, अशी वातावरण निर्मिती राजकीय पक्ष, उमेदवार करु शकले नाहीतमतदान कमी होण्यामागे अनेक कारणे मतदानावरुन पुणेकरांना कोणी आव्हान देऊ शकत नाही. पुणेकरांचे कर्तृत्व अबाधितमतदान कमी झाले, हे खरे असले तरी नेमके उत्तर शोधायला हवेमतदारयाद्यांमधील घोळ हे मतदान कमी होण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण

पुणे : मतदानाची पुण्यातली टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा घसरली याचा दोष पुणेकरांचा नसून खासदार होऊ पाहणाऱ्या उमेदवार आणि त्यांच्या पक्षांचा असल्याची प्रतिक्रिया पुणेकरांमधून व्यक्त झाली. पुणेकर मतदानाला उत्साहाने बाहेर पडले नाहीत, याचे कारण उमेदवारांबद्दल पुुणेकरांमध्ये असलेली नापसंती हे असू शकते. प्रचारामध्ये चुरस नसल्यानेही पुणेकरांनी निवडणुकीकडे पाठ फिरवली असेल, असे सांगण्यात येत आहे. 

काही पुणेरी प्रतिक्रिया
पुणेकरांना दोष देणे चुकीचे 
‘‘मतदान कमी झाल्याने आभाळ कोसळले, असे मानण्याचे कारण नाही. नुकत्याच परीक्षा संपल्याने सुट्ट्यांचा काळ आहे. अनेक दुबार, स्थलांतरीत, मयत लोकांची सुमारे १० टक्के नावे मतदार यादीत असल्याने मुळातच मतदारसंख्या जास्त दिसते. महत्त्वाचे म्हणजे मतदारांना उत्साह वाटावे, अशी वातावरण निर्मिती राजकीय पक्ष, उमेदवार करु शकले नाहीत. तरीही ५० टक्के पुणेकर स्वत:हून मतदानाला बाहेर पडले, ही चांगली बाब आहे.’’
-ज्येष्ठ राजकीय नेते अंकुश काकडे, नवी पेठ, दोन पिढ्यांचे पुणेकर. 

पुणेकरांना आव्हान देऊ नये
‘‘पुणेकरांचे मतदान कमी पडले, ही वस्तुस्थिती आहे. अधिक मतदान झाले असते तर मला ते आवडले असते. पण मतदान कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार मतदारांपर्यंत पोचले नाहीत. प्रचारात चुरस नव्हती. त्यामुळे घसरलेल्या मतदानावरुन पुणेकरांना कोणी आव्हान देऊ शकत नाही. पुणेकरांचे कर्तृत्व अबाधित आहे.’’
-पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, लोकमाान्य नगर, दोन पिढ्यांचे पुणेकर.
 
दोष राजकीय पक्षांचा
‘‘उमेदवारांबद्दलचा भ्रमनिरास, उमेदवारांबद्दलची नाराजी यामुळे मतदार घरी बसले. त्यामुळे मतदानाचा घसरलेला टक्का हे पुणेकरांचे अपयश नसून राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे आहे. निवडणुकीत चुरस निर्माण झाली तरच मतदारांमध्ये उत्साह दिसतो. त्यामुळे आत्मपरिक्षण पुणेकरांनी नव्हे तर राजकारण्यांनी करावे.’’
-राजकीय नेते अजय शिंदे, सदाशिव पेठ, दोन पिढ्यांचे पुणेकर.

अस्सल पुणेकरच कमी झाले
‘‘मतदान कमी झाले, हे खरे असले तरी नेमके उत्तर शोधायला हवे. मतदान न करणा-यांमध्ये अस्सल पुणेकर किती आणि बाहेरुन पुण्यात स्थायिक झालेले किती, याबाबत नेमका अंदाज येणे अवघड आहे. पुण्यात अस्सल पुणेकरांचा टक्का घसरल्याने मतदानाचाही टक्का घसरला आहे.’’
-व्यंग्यचित्रकार चारुहास पंडित, कोथरूड, तीन पिढ्यांचे पुणेकर

‘लाल फिती’ला वैतागले पुणेकर
‘‘मतदारयाद्यांमधील घोळ हे मतदान कमी होण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण आहे. अनेक नागरिक मतदान केंद्रांपर्यंत गेले. मात्र, खूप प्रयत्न करुनही त्यांना यादीत नावेच सापडली नाहीत. याआधी अनेकदा मतदान करुनही अचानक यादीतून नावे गायब झाली. सत्ता कोणाचीही असली तरी प्रशासनातील अनास्था कायम आहे. तीन-चार वेळा दुरुस्तीसाठी अथवा बदलासाठी अर्ज करुनही यादीत बदल झालेले नाहीत. हुज्जत घालूनही नावे न मिळाल्याने नागरिक वैैतागले. त्यामुळे पुणेकर घराबाहेर पडलेच नाहीत, असे म्हणता येत नाही.
-लेखक-दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे, सिंहगड रस्ता, दोन पिढ्यांचे पुणेकर

चौकट
पुण्याचा इतिहास
सन १९६७ मध्ये ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. त्या वर्षी झालेले ६९.६४ टक्के मतदान हे पुण्यातले आजवरचे सर्वोच्च होय. तर पुण्याच्या इतिहासातील सर्वात कमी मतदान सन २००९ मध्ये ४०.६६ इतके झाले. त्यावर्षी सुरेश कलमाडी कॉंग्रेसकडून विजयी झाले. दरम्यान, गेल्या सलग पाच लोकसभा निवडणुकांमध्ये पुण्यातल्या मतदानाची टक्केवारी ५५ च्या पुढे गेलेली नाही.   

चौकट
सोशल मीडियातली शेलकी शेरेबाजी
-‘पुणे मतदानात उणे’
-‘पुणेकरांनी इतरांना शहाणपणा शिकवणाच्या जन्मजात हक्काबाबत शंका निर्माण केल्या आहेत’
-‘पुणेकर १ ते ४ झोपले की काय?’
-‘पुस्तक दिनी पुणेकर वाचनात इतके रमले की मतदान करायला विसरले’
-ज्यांना स्वत:चे मत असते तेच देतात
-दुसऱ्यांना शहाणपणा शिकवण्याची टक्केवारी १००; मतदानाची मात्र ५० च.


 

Web Title: We 'clear ' innocent! Due to the reduced voting ''it '' is responsiblity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.