पुणे : देशातील सहाशे कलाकार एकत्र येत त्यांनी भाजपाच्या विराेधात मतदान करा असे आवाहन केले आहे. यात ज्येष्ठ दिग्दर्शक अमाेल पालेकर यांच्याबराेबरच अभिनेते नसरुद्दीन शहा यांचा सहभाग आहे. या सहाशे कलाकारांची मते विराेधात गेली तरी भाजपाला फरक पडत नसून भाजपाच्या बाजूने चाैकाचाैकात सहा हजार मतदार उभे राहतील अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी कलाकारांवर केली. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन 600 कलाकारांनी केलं आहे. विशेष म्हणजे या कलाकारांमध्ये नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकरसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. भाजपाविरोधात मतदान करून त्यांना व त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेतून पायउतार करा, असं आवाहन या कलाकारांनी केलं आहे.
भाजपाविरोधात मतदान करा, नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकरसह 600 कलाकारांचं आवाहन
कलाकारांनी यासंदर्भात एक पत्रकही जारी केलं आहे. या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, शांता गोखले, महेश एलकुंचवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन-शर्मा, रत्ना पाठक-शहा, लिलेट दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे, अुनराग कश्यप, एम. के. रैना आणि उषा गांगुली यांच्या स्वाक्षऱ्या पाहायला मिळत आहेत. खरं तर हे पत्र एक दोन, नव्हे तर 12 भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे. आर्टिस्ट युनायटेड इंडियाच्या संकेतस्थळावर हे पत्र अपलोड करण्यात आलं आहे.
सहाशे कलाकारांची मते नाही मिळाली तरी भाजपाला फरक पडत नसल्याचे हुसेन म्हणाले. तसेच अशी टीका करण्यापेक्षा कलाकारांनी राजकारणात येऊन थेट टीका करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी कलाकारांना दिले. देशात भिती वाटते असे नसरुद्दीन शहा एका मुलाखतीत म्हंटले हाेते. त्यावर हुसेन म्हणाले की शहांना भीती वाटते तर आम्ही काही करु शकत नाही. 600 कलाकारांनी आम्हाला मतदान केले नाही तरी आम्हाला फरक पडत नाही. आम्हाला देशातील 132 कराेड लाेक मतदान करतील.