साड्या नको विकास हवा; इंदापूरात 'या' नेत्याने दिलेल्या साड्या रस्त्यावर फेकल्या, महिला संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 03:43 PM2024-10-21T15:43:23+5:302024-10-21T15:43:52+5:30

वीज, पाणी, रस्ते यांची सुविधा नाही, साड्यांचे आमिष दाखवून तुम्ही मते मागता, विकास कुठंय अशी थेट विचारणा या महिलांनी केली

We don't need sarees we need development Sarees given by leader thrown on road in Indapur women angry | साड्या नको विकास हवा; इंदापूरात 'या' नेत्याने दिलेल्या साड्या रस्त्यावर फेकल्या, महिला संतप्त

साड्या नको विकास हवा; इंदापूरात 'या' नेत्याने दिलेल्या साड्या रस्त्यावर फेकल्या, महिला संतप्त

इंदापूर : साड्यांचे आमिष दाखवून तुम्ही मते मागता आहात. विकास कुठे आहे अशी विचारणा करत कळंब गावच्या हद्दीतील महिलांनी दत्तात्रय भरणे यांच्या मार्फत देण्यात आलेल्या साड्या रस्त्यांवर फेकून दिल्या. आम्हाला साड्या नको विकास हवा आहे अशी मागणी केल्याचा प्रकार घडला आहे.

मागील दोन आठवड्यापासून इंदापूर तालुक्यात गावागावातील प्रत्येक घरात दत्तात्रय भरणे यांचे सस्मित छायाचित्र असणा-या पिशवीतील साड्यांचे वाटप करण्यात येत आहे. मतदारांच्या घरात किती महिला मतदार आहेत याची व्यवस्थित यादी करण्यात आली आहे. त्या यादीनुसार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून साड्यांचे वाटप करण्यात येत आहे. वालचंदनगर नजीक असणा-या कळंब गाव व परिसरातील वाड्या वस्त्यांवर ही साड्या पोहोचवण्यात आल्या. घोडकेवस्तीवरील महिलांनी या साड्या घेण्यास स्पष्ट नकार दिला.

साड्यांचे आमिष दाखवून तुम्ही मते मागता. विकास कुठाय अशी थेट विचारणा या महिलांनी केली. घोडकेवस्तीवर वीज, पाणी, रस्ते यांची सुविधा नाही. घोडकेवस्तीवरुन पवारवस्तीकडे जाणा-या कच्च्या रस्त्यावरुन ये जा करणे अवघड होते. सायकलवरुन ये जा करणा-या शाळकरी मुलांच्या सायकली घसरतात. वीज द्यावी यासाठी तीन तीन वेळा सरपंचांना सांगितले,मात्र ते मागणीकडे काणाडोळा करत आहेत, अशा तक्रारी महिलांनी मांडल्या. तरुणांना नोक-या नाहीत या वस्तुस्थितीकडे ही लक्ष वेधले. पासष्ट वर्षावरील महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ का मिळत नाही. त्या सरकारच्या सावत्र बहिणी आहेत का? असा सवाल एका वयोवृद्ध महिलेने विचारला. या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.

Web Title: We don't need sarees we need development Sarees given by leader thrown on road in Indapur women angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.