शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अशा सत्तेवर आम्ही थुंकतो, भाजपा हा चार टोळक्यांचा पक्ष : संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 5:00 AM

भाजपा शिवसेनेला खतम करण्याचा प्रयत्न करीत आहे; परंतु जो हा प्रयत्न करील, तोच संपेल. शिवसेना कधीही सत्तेतून बाहेर पडेल. सध्याची सत्ता तात्पुरती आहे, अशा सत्तेवर आम्ही थुंकतो़ भाजपा हा चार टोळक्यांचा पक्ष आहे़

नारायणगाव : भाजपा शिवसेनेला खतम करण्याचा प्रयत्न करीत आहे; परंतु जो हा प्रयत्न करील, तोच संपेल. शिवसेना कधीही सत्तेतून बाहेर पडेल. सध्याची सत्ता तात्पुरती आहे, अशा सत्तेवर आम्ही थुंकतो़ भाजपा हा चार टोळक्यांचा पक्ष आहे़, अशी थेट टीका शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी नारायणगाव येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात केली.या मेळाव्यात राऊत यांनी भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षावर टीका केली़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करून पुढील काळात स्वबळावर निवडणूक लढविणार, असे वक्तव्य केले़ या वेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार सुरेश गोरे, जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, उपसहसंपर्क प्रमुख अविनाश रहाणे, शिवसेनेच्या गटनेत्या आषाताई बुचके, जि़. प. सदस्य गुलाब पारखे, देवराम लांडे, उद्योजक बाजीराव दांगट, सुरेश भोर, शरद चौधरी, माऊली खंडागळे, अरुण गिरे, गणेश कवडे, जयश्री पलांडे, उपसभापती दिलीप डुंबरे, पंचायत सभापती ललिता चव्हाण, संतोश खैरे, स्मिता विटे, विजया शिंदे, सुलभा उबाळे, हिराताई चव्हाण, बाळासाहेब पाटे, आनंद रासकर व शिवसैनिक उपस्थित होते़राऊत पुढे म्हणाले, की शिवसेना मुंबईत बुलेट टेÑन येऊ देणार नाही़ त्याला शिवसेनेचा विरोध राहील़ शिवसेना संपविण्याचे स्वप्नही बुलेट टेÑनसारखे आहे़, अशी टीका करून ते म्हणाले, की सध्या केंद्र शासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करणार आहेत़ शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांची आज दुरवस्था झालेली असून शिवसेनेत गद्दारांना स्थान नाही़येत्या विधानसभेत १४५ पेक्षा जास्त आमदार निवडून येतील. जुन्नर तालुक्यात या वेळी भगवा फडकावणारच़ तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातून ४ आमदार निवडून आणू, असे राऊत म्हणाले.खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील म्हणाले, की भाजपाने स्वप्न दाखविले़शेतकरी कोसळला गेला़ देशाची परिस्थिती वाईट झाली आहे़ नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे़ आशाताई बुचके, माऊली खंडागळे यांनी आपले विचार व्यक्त केले़ हेमंत कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश कवडे यांनी आभार मानले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार