" मलाही कळतंय, अनेक दिवस हेच सुरुय, सहनशीलता संपतेय...पण, जनतेने सहकार्य करावं!"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 05:20 PM2021-04-10T17:20:38+5:302021-04-10T18:56:26+5:30

टीका व राजकारण न करता प्रत्येकाने आपापले काम करावे: अजित पवार

"We used to say that the Center did not do this and they used to say that ...; now we will work without criticism-politics" | " मलाही कळतंय, अनेक दिवस हेच सुरुय, सहनशीलता संपतेय...पण, जनतेने सहकार्य करावं!"

" मलाही कळतंय, अनेक दिवस हेच सुरुय, सहनशीलता संपतेय...पण, जनतेने सहकार्य करावं!"

googlenewsNext

पुणे : मलाही कळतंय की केले अनेक दिवस हे काम सुरु आहे. सहनशीलता संपतेय. पण सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करावे. तरच कोरोनाची साखळी तोडता येईल. एकमेकांवर टीका व राजकारण न करता प्रत्येकाने आपापले काम करावे. केंद्राने हे केलं नाही असं आम्ही म्हणायचं आणि त्यांनी म्हणायचं की आम्ही देतो हे न करता कोरोना विरुद्धच्या लढाईत काम करणं गरजेचं आहे. असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.. 

पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे महापौर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होत आहे. केंद्राशी निगडीत प्रश्नाबाबत नेमकी काय परिस्थिती याचा आढावा घेतला. लसीच्या बाबतीत एक लाखाचं टार्गेट ठेवले होते. ८५,००० केले. पण लस कमी पडली. जावडेकरांनी सांगितलं की जितकी लस आवश्यक असेल तितके मिळतील. आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचे केंद्र सरकारतर्फे प्रकाश जावडेकरांनी आश्वासन दिले आहे.


अजित पवार म्हणाले, उद्या पुण्यातुन विभागीय आयुक्त, पोलीस आणि महापालिका आयुक्त व्यापाऱ्यांसोबत बैठक घेणार असून दुकानांबाबतची भूमिका .  घेतला जाईल. पूर्वी कोरोना सगळ्यांना होत नव्हता, प्रसार कमी होता,आता तो कुटुंबातल्या सगळ्यांना होतो. लसीकरण घेतल्यावर पॉझिटिव्ह आल्यावर त्रास कमी होतो. ससुन हॅास्पिटल मध्ये ५०० बेड पर्यंत नेण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. ससुनला ॲाक्सिजनसाठी ॲटलस कॉपको नी मशीन दिलं आहे. अशाप्रमाणे कोरोनाच्या संकटाच्या नियोजनाचा सामना करण्याचा प्रयत्न  करत आहोत.

Web Title: "We used to say that the Center did not do this and they used to say that ...; now we will work without criticism-politics"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.