काय साध्य होईल :
अंकज्ञान होईल. सूचनापालनाचा सराव होईल.
सज्जतेसाठी घोषणा :
हम भी बाजार जाएंगे, लड्डू-पेढ़े खायेंगे.
खेळ खेळायचा कसा :
सर्व खेळाडूंचा एक गोल तयार करून घ्यावा. गोल आखलेला असल्यास उत्तम. शिट्टी होताच सर्व खेळाडू गोलावर पळू लागतील. शिक्षक हम भी बजार जायेंगे असे म्हणतील. खेळाडू लड्डू-पेढ़े खायेंगे- असे म्हणतील. शिक्षक "लड्डू होंगे चार-पाच" इ. अशी कोणतीही एक संख्या पुकारतील. त्यानुसार विद्यार्थी तितक्या संख्येचा एक गट करून उभे राहतील.
उदा : शिक्षक जर “लड्डू होंगे सहा" असे म्हटल्यास जर २० मुले असतील तर ६ चे तीन गट होतील. जी दोन मुले उरतील ती बाद.
अशा प्रकारे उरलेली संख्या बघून शिक्षकांनी अंक पुकारावा. शेवटी दोन उरेपर्यंत खेळ चालू ठेवावा. विजयी मुलांचे अभिनंदन करावे.
बाद झालेल्या विद्यार्थ्यांना गमतीची शिक्षा करून परत प्रवेश देता येईल.