राजगुरूनगर :‘माफियागिरी करणारे घोटाळेबाज, कोरोना काळात जनतेच्या जीवाशी ज्यांनी खेळ खेळले, तेच आमचे टार्गेट आहे. त्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही. असा इशारा सत्ताधाऱ्यांना देत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरकारवर निशाणा साधला.
सोमय्या म्हणाले, संजय राऊतांना मी पहिल्या दिवसापासून शंभर वेळा उत्तर दिले आहे. पुण्यातील जम्बो कोरोना रुग्णालयाचा घोटाळा हा संजय राऊतांची पार्टनरची कंपनीचा आहे. राकेश वाधवान आणि माझा काहीही संबंध नाही. तीन हजार एकशे पानी पत्र लिहिल्याने तो पुरावा म्हणायचं का? त्या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा दखल घेतली नाही. यशवंत जाधवांच्या विरोधात लवकरच गुन्हा दाखल होईल, जरंडेश्वर कारखान्याचा जप्त करून शेतकऱ्यांना लवकरच पुन्हा दिला जाईल, असा निर्णय न्यायालय घेईल असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझी वाट्टेल ती चौकशी करावी, असे खुले आव्हान देखील सोमय्या यांनी दिले.
न्यायालय पाचवा एजंट आहे असं सामना मध्ये लिहा
''वाधवानचा अन माझा दूर दूर पर्यंत संबंध नाही, हे मी अनेकदा सांगतोय. आता मी त्यावर उत्तर दिले नाही, असं म्हणू नका. मी ज्या तक्रारी करतोय त्यात तथ्य आणि दम असतो. त्यामुळे त्यात कारवाई होते. न्यायालय त्यांना दाद देत नाही. मग न्यायालय पाचवा एजंट आहे असं सामना मध्ये लिहा, आहे का हिम्मत? किरीट सोमैय्याने जी कागदपत्रे दिली त्याआधारे अनिल परबांचं रिसॉर्ट अनधिकृत आहे, असं स्पष्ट झाले असल्याचे सोमय्या यावेळी म्हणाले आहेत.''