पुणे : केंद्र सरकारच्या आदेशानुसार देशभरात लसीकरण केले जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद असून ज्यावेळी आम्हाला लस दिली जाईल. तेव्हा लस निश्चित घेईल आणि लस देईल देखील, पण प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की, मी लस घेणार नाही. पण आम्ही त्यांना देणार नसल्याचे विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना केले़
देशभरात कोरोना लस पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी वर्गाला देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही लस केव्हा घेणार आणि प्रकाश आंबेडकर हे लस घेणार नाही. त्यावर आपली काय भूमिका राहील, यावर उत्तर देताना आठवले यांनी आंबेडकर यांना लस नाही असे उत्तर दिले़
राज्यातील येऊ घातलेल्या आगामी पाच महापालिका निवडणुकीत आरपीआय भाजपासोबतच राहणार आहे. आम्ही त्या निवडणुका जिंकणार आहोत. त्यानंतर २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील भाजपासोबत असणार आहोत. आम्हाला त्या निवडणुकीत देखील यश मिळणार असल्याचा विश्वास आठवले यांनी या वेळी व्यक्त केला़