लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेमडेसिविर आणि ऑॅक्सिजनसाठी निधी पूर्णपणे महापालिका देईल, पण आम्हाला दोन्हींचा मुबलक साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ़ राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे़
मोहोळ यांनी सौरभ राव व डॉ़ देशमुख यांची भेट घेतली़ या वेळी सभागृह नेते गणेश बीडकर आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, महापालिकेची सर्व रूग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू असून, खाजगी रूग्णालयांमधील ८० टक्के खाटा महापालिकेने ताब्यात घेऊन तेथे कोरोनाबाधितांवर उपचार चालू केले आहेत. परंतु रूग्णसंख्येच्या तुलनेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा अत्यल्प आहे. रुग्ण आपले प्राण गमावत आहेत. २५० मेट्रिक टन ऑॅक्सिजनची प्रतिदिन गरज आहे. या दोन्हीही गोष्टी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिल्यास, महापालिका स्वखर्चाने शहरातील रूग्णांकरिता ते खरेदी करतील असेही निवेदन आम्ही दिले आहे.
--------------------------