Kirit Somaiya: महविकास आघाडीच्या अजून दहा लोकांना आम्ही जेलमध्ये पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 05:21 PM2021-11-21T17:21:01+5:302021-11-21T17:21:11+5:30

विधीमंडळाचे अधिवेशन चालू दिल्यास आम्ही सरकारवर अविश्वास ठराव दाखल करू

We will send ten more people of Mahavikas Aghadi to jail | Kirit Somaiya: महविकास आघाडीच्या अजून दहा लोकांना आम्ही जेलमध्ये पाठवणार

Kirit Somaiya: महविकास आघाडीच्या अजून दहा लोकांना आम्ही जेलमध्ये पाठवणार

googlenewsNext

पिंपरी : राज्यातील ठाकरे सरकार आता नौटंकी करत आहे. पवार साहेब कुणा - कुणासाठी हिशोब मागणार, ही तर सुरवात आहे. अजून दहा लोकांना आम्ही जेलमध्ये पाठवणार आहोत, विधीमंडळाचे अधिवेशन चालू दिल्यास आम्ही सरकारवर अविश्वास ठराव दाखल करू, अशी टीका भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यातील मंत्र्यांवर टीका करताना सोमय्या म्हणाले, ''महाराष्ट्रात नटसम्राट एकच होता, पण ते पद आता ह्यांना द्यावं लागेल. बहीण नाही तर अजित पवारांनी आपल्या आईच्या नावावरही बेनामी इस्टेट जमा केली केली आहे. तसेच भावना गवळी यांनी सरकारचे ४४ कोटीं ढापले, आनंदराव अडसूळ यांनी १०० कोटींचा घोटाळा केला. त्यासाठी त्यांना नोटिसा दिल्या गेल्यात. यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार काहीच का बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्नीच्या नावे १९ बंगले बांधले आहेत. खासदार संजय राऊत यांनी बेनामी ५५ लाख परत करून माफी मागितली आहे. जालना सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरण उघडकीस आले आहे. कारखान्याचे मालक अर्जुन खोतकरच असल्याचे पुरावे दिले आहेत. पवार साहेब कुणा-कुणासाठी हिशोब मागणार, ही तर सुरूवात आहे. अजून दहा लोकांना आम्ही जेलमध्ये पाठवणार आहोत, विधीमंडळाचे अधिवेशन चालू दिल्यास आम्ही सरकारवर अविश्वास ठराव दाखल करणार आहोत.''

पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या आले होते. त्यावेळी त्यांनी टीका केली. यावेळी शहराध्यक्ष महेश लांडगे,  महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर हिराबाई घुले, प्रदेश महिला अध्यक्षा उमा खापरे, प्रवक्ते अमोल थोरात आदी उपस्थित होते.

Web Title: We will send ten more people of Mahavikas Aghadi to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.