पुणे : विकासाच्या प्रक्रीयेमध्ये ज्यांचं याेगदान हाेऊ शकतं अशा काही इतर पक्षातील नेत्यांनाच भाजपामध्ये प्रवेश देण्यात येत असल्याचे शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी सांगितले. तसेच अपकी बार 220 पार असा नारा देखील त्यांनी दिला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये ते बाेलत हाेते. गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये माेठ्याप्रमाणावर इतर पक्षातील नेते प्रवेश करत आहेत. सुरक्षा यंत्रणांचा चुकीचा वापर करुन इतर पक्षातील नेत्यांना भाजपात प्रवेश देण्यात येत असल्याचा आराेप शरद पवार यांनी केला हाेता. त्याला उत्तर देताना ज्यांच्यावर ईडीची चाैकशी सुरु आहे अशांना पक्षात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले हाेते.
भाजपात हाेणाऱ्या पक्षप्रवेशाबाबत तावडे यांना विचारले असता. तावडे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी म्हंटल्याप्रमाणे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आराेप आहेत त्यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात येत नाही. ज्यांचे विकासाच्या प्रक्रीयेमध्ये याेगदान हाेऊ शकतं अशाच नेत्यांना मुख्यमंत्री आणि चंद्रकांतदादा पाटील पक्षात प्रवेश देत आहेत.
मुख्यमंत्री काेणाचा हाेणार याबाबत विचारले असता त्याचे उत्तर खासगीत सांगताे असे म्हणत तावडे यांनी उत्तर देण्याचे टाळले. तसेच यंदाची निवडणुक महायुती एकत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अपकी बार 220 बार असा नारा देखील त्यांनी यावेळी दिला.