शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

Raosaheb Danve: पंतप्रधान मोदींनी आणलेल्या लोकोपयोगी योजनांच्या जोरावर विधानसभा जिंकू; रावसाहेब दानवेंचा विश्वास

By श्रीकिशन काळे | Published: July 21, 2024 1:10 PM

विरोधकांनी खोटे बोलून लोकांना फसवलं, चुकीचा नरेटिव्ह समोर ठेवला तरी देखील मोदींचे सरकार पुन्हा आले

पुणे : देशात पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आहेत. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मी मांडतो. मोदींनी गेल्या काही वर्षांत अनेक लोकोपयोगी योजना आणल्या आहेत. त्यामुळे त्याच योजनांच्या जोरावर आपण विधानसभा जिंकू, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. भाजपचे अधिवेशन आज बालेवाडीत सुरू आहे. त्यामध्ये दानवे यांनी मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर ते बोलत होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

दानवे म्हणाले, आपण १० कोटी लोकांना मोफत गॅस दिलाय. हर घर जल योजना आणली. १४ कोटी लोकांना नळाचे पाणी दिले. शेतकरी यांच्या खात्यात १२ हजार रूपये टाकले जात आहेत. लोकोपयोगी योजना करूनही लोकसभेत आपल्याला पराभव मिळाला. आज सर्व पक्ष एकत्र आले आणि मोदींचा मुकाबला करत आहेत. ते सर्व एकत्र आले तरी मोदी हेच पंतप्रधान आहेत. त्यांचे प्रधानमंत्री सांगू शकले नाही. त्यांच्याकडे नेता नाहीय. आज मोदींचे सरकार आले आहे. 

मोदी यांनी आपली अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आणली. आता लवकरच तिसरा क्रमांक पटकावू. विरोधकांनी खोटे बोलून लोकांना फसवलं. चुकीचा नरेटिव्ह समोर ठेवला. पण तरी देखील मोदींचे सरकार पुन्हा आलेय. जगातले लोकं आपली तारीफ करतात आणि राहुल गांधी लंडनला जाऊन भारतात कायद सुव्यवस्था बिघडली असे म्हणतात. खरं तर यापुर्वी त्यांच्या सरकारने देशात आणीबाणी आणली होती आणि अराजकता पसरवली. या निवडणुकीत त्यांच्याकडे मुद्दाच नव्हता. मग ते म्हणतात संविधान बदलणार. पण भाजप संविधान बदलणार नाही. ते खोटं बोल पण रेटून बोल असं करत आहेत. भारतीय राज्यघटनेचा मूळ ढाचा बदलू शकत नाही. आम्ही तो कधीच बदलणार नाही‌. आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. तयारीला लागा. आपल्याला जिंकायचे आहे.

टॅग्स :Puneपुणेraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाPoliticsराजकारणMahayutiमहायुतीNarendra Modiनरेंद्र मोदी