शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

Weather Alert : पावसाच्या ओढीने राज्यात चिंतेचे ‘ढग’; ११ जुलैनंतर पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 8:18 PM

पुढील आठवडाभर मोठ्या पावसाची शक्यता कमीच

पुणे : पावसाळा सुरु झाल्यानंतर प्रथमच राज्यात शुक्रवारी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील रविवारपर्यंत अशीच परिस्थिती राहणार असून ११ जुलैनंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पोषक वातावरण नसल्याने २० जूनपासून मॉन्सूनमध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे ढग दाटून आले आहेत.

शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकणातील पणजी, राजापूर येथे हलका पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा आणि पन्हाळा येथे पावसाची नोंद झाली असून विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडला होता. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. 

गेल्या आठवड्यात (२४ ते ३० जून) कोकण, मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात असणार्‍या घाटमाथ्यासह विदर्भात मोठ्या प्रमाणावर पावसाने ओढ दिली आहे. 

अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, जालना, जळगाव, औरंगाबाद या ६ जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात पावसात ६० टक्क्यांहून अधिक तूट आढळून आली आहे. १४ जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी पाऊस झाला आहे. 

यामुळे होत नाही पाऊसयाबाबत हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, विषवत्तीय भागातील आफ्रिकेत पावसाला सुरुवात झाली की, तेथील शुष्क हवा आपल्याकडे ढकलली जाते. या हवेत धुलीकणांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आकाशात काळे ढग दिसत असले तरी ते उंचावर जाण्यास हे धुलीकण रोखतात. ढगांची निर्मिती झाली या ढगांमध्ये बाष्प असले तरी बाहेरील हवेतील शुष्क हवा त्यांचे थेंबात रुपांतर करण्यापासून रोखले जाते. त्या ढगांमधील पाणी कमी होते. त्यामुळे पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेले पोषण वातावरण तयार होत नाही. त्यामुळे आकाशात काळे ढग दिसले तरी सध्या पाऊस पडताना दिसत नाही. सध्याची स्थिती अजून ११ जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

कोकणामध्ये पावसाळ्यात नेहमीच पाऊस पडत असतो. मात्र, सध्याच्या स्थितीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील चार दिवस कोकणात कोठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 

६ व ७ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ...पुढील २ आठवड्यांचा पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे त्यात पहिल्या आठवड्यात (२ ते ८ जुलै) कोकणात सरासरीपेक्षा कमी, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी ते सरासरी इतका, मराठवाड्याच्या पूर्व भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

दुसऱ्या आठवड्यात (९ ते १५ जुलै) पावसाला सुरुवात होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात अधिक तर पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरी