शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

Weather Alert : गुजरात, कोकण, मध्य महाराष्ट्रात १६ व १७ मे रोजी 'ऑरेंज अलर्ट' जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 8:56 PM

आग्नेय अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचे १६ में रोजी होणार चक्रीवादळात रूपांतर.....

पुणे : दक्षिणपूर्व अरबी समुद्र व लक्षद्वीप परिसरात गुरुवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचे १६ मे रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा मार्ग लक्षात घेता ते १८ मे रोजी अथवा त्यानंतर गुजरात व पाकिस्तानच्या किनारपट्टी दरम्यान धडकण्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे गुजरातसह कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाने १६ व १७ मे रोजी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. 

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, आग्नेय अरबी समुद्रात गुरुवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील २४ तासात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते उत्तर - वायव्य दिशेने गुजरात आणि त्याच्या बाजूच्या पाकिस्तानच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. सध्याचा त्याचा मार्ग लक्षात घेता ते १८ मे रोजी सायंकाळच्या सुमारास गुजरात किनारपट्टीजवळ पोहचण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

लक्षद्वीप बेट समूह, केरळ या परिसरात १४ व १५ मे रोजी जोरदार ते अतिजोरदार पाऊस होईल. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तामिळनाडुतील घाट परिसर, कर्नाटक किनारपट्टी भागात १४ मे रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गोवा व दक्षिण कोकणात १५ मे रोजी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. १६ व १७ मे रोजी कोकणातील सिंधुदुर्ग  व रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरातमधील सौराष्ट्र, कच्छ भागात १८ मे रोजी जोरदार पावसाची शक्यता असून त्याला जोडून असलेल्या दक्षिणपश्चिम राजस्थानातही १९ मे रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

महाराष्ट्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ व १७ मे रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून संपूर्ण कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट भागात १६ व १७ मे रोजी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

पुणे जिल्ह्यात १७ मे रोजी ऑरेंज अलर्टपुणे जिल्ह्यातील घाट परिसरात १७ मे रोजी काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून येथेही हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. घाट परिसरात राहणारे व त्या भागातील जाणार्‍यांनी सतर्क रहावे, असा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही १६ व १७ मे रोजी काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरातweatherहवामानRainपाऊस