शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

Weather Update: पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पूर्वमौसमी पावसाच्या सरी; पुढील २४ तासांमध्ये राज्यात जोरदार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 9:17 PM

गेल्या २४ तासात राज्यात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

पुणे : गेल्या चार दिवसात मॉन्सूनमध्ये कोणतीही प्रगती झाली नसतानाच पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर्वमौसमी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवारी पुणे शहरात सायंकाळी सुमारे तासभर पावसाच्या जोरदार सरी आल्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे १५ मिमी तर, लोहगाव येथे ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

पुण्याबरोबर सांताक्रुझ ४८, पणजी ०.६, महाबळेश्वर ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या २४ तासात राज्यात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत माथेरान ७३, ओझर २२, धुळे १७, मार्गागोवा १४, अकोला १४, पेंडा १३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

१ जून रोजी पालघर, लातूर, परभणी, उस्मानाबाद हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुण्यात यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात १ मार्च पासून आतापर्यंत १२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ती सरासरीपेक्षा ७५ मिमी ने अधिक आहे.

कोथरुडमध्ये एका तासात ६४ मिमी पाऊसशहरातील वेगवेगळ्या भागात पावसाचा अधिक जोर दिसून आला. आशय मेजरमेंटनुसार कोथरुडमध्ये एका तासात तब्बल ६४ मिमी इतका मुसळधार पाऊस पडला. कोथरुडमध्ये सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत ६८.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.कोथरुड, सिंहगड रोड, खडकवासला, नगर रोड परिसरात धुवांधार पाऊस झाला. त्याचवेळी कात्रज, आंबेगाव परिसरात पावसाची हलकी सर आली होती. 

रात्री साडेआठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस(मिमी)शिवाजीनगर १६.६पाषाण ४०खडकवासला ३४कोथरुड ६८.४वारजे ३५.४कात्रज २.६

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानMonsoon Specialमानसून स्पेशलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड