भोर शहरात परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६१ वर गेली आहे. तालुक्यात तब्बल २० हजार ५२ रुग्ण असून त्यातील २० हजार २० जणंना उपचारानंतर घरी सोडले आहे. सध्या १२ हजार १३६ जणांची तपासणी झाली असून त्याचा प्रलंबित आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भोर शहरात व ग्रामीण भागातील गावात कोरोना पॉझिटिव्ह वाढत गेले असून एकूण ६१ जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. विशेषत: भोर शहरात कोरोना वाढत आहे तर ग्रामीण भागातील कोरोनाचा शिरकाव होत आहे. तरीदेखील नागरिक फारसी काळजी घेताना दिसत नाहीत हॉटेल, दुकानात, आठवडे बाजारासह सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. प्रशासन सकाळी १० ते १ वाजेपर्यंत मास्क न घालणाऱ्यावर कारवाई करत आहेत, त्यामुळे मास्क न लावता फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भोर नगरपलिका व पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्याची मागणी होत असून भोर शहरासह ग्रामीण भागातील गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे भोर प्रशासनाकडून विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा कोरोना दिवसेंदिवस दिवस वाढ होऊ शकते. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.