पुणे : शहरात बुधवारी २६६ कोरोनाबाधित आढळून आले असून, २१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ९ हजार ६०४ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.७६ टक्के इतकी आढळून आली आहे़
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही २ हजार ५६ असून, आज दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला आह़े़ यापैकी ८ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार: शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २०२ इतकी असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २६१ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३० लाख २६ हजार ७१६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९१ हजार ८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, यापैकी ४ लाख ८० हजार ८९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८६३ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील कोरोनास्थिती
बुधवारी बाधित : २६६
घरी सोडले : २१५
एकूण बाधित रुग्ण : ४,९१,००८
सक्रिय रुग्ण : २०५६
आजचे मृत्यू : १३
एकूण मृत्यू : ८, ८६३