पुणे : शहरात बुधवारी तब्बल ३९९ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, शंभरीच्या आत आलेला हा आकडा वाढल्याने पुन्हा एकदा चिंतेत भर घातली गेली आहे़ दरम्यान, आज दिवसभरात २१६ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ९६१ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ४.४५ टक्के इतकी आढळून आली आहे़
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या आज पुन्हा २ हजाराच्या पुढे गेली असून, आजमितीला २ हजार ६६ सक्रिय रुग्ण शहरात आहेत़ आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आह़े़ यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही २०८ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २५७ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३० लाख ८२ हजार ७८३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९४ हजार १८५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, यापैकी ४ लाख ८३ हजार २२१ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८९८ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील कोरोनास्थिती -
बुधवारी बाधित : ३९९
घरी सोडले : २१६
एकूण बाधित रुग्ण : ४,९४,१८५
सक्रिय रुग्ण : २०६६
आजचे मृत्यू : ०९
एकूण मृत्यू : ८,८९८