लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडा बुधवारीही साडेपाच हजाराच्या पुढे राहिला आहे. आज केलेल्या २६ हजार १२० तपासणीमध्ये ५ हजार ६५१ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी २१.६३ टक्के इतकी आहे़
शहरात आज दिवसभरात तब्बल ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १३ जण हे शहराबाहेरील आहेत़ शहरातील कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूची टक्केवारी ही १.८२ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ३२५ णांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर ९५७ रूग्ण हे गंभीर आहेत़ तर आज दिवसभरात ४ हजार ३६१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्णांचा आकडा ४६ हजार ७१ इतका झाला आहे़
शहरात आजपर्यंत १६ लाख १९ हजार ८५६ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी ३ लाख ५ हजार ३७२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ५३ हजार ७३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ५६७ झाली आहे़