पुणे : पुणे महापालिकेकडून मंगळवारी रात्री बुधवार, दि. १२ मेच्या लसीकरणाचे नियोजन जाहीर केले आहे. शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर केवळ कोव्हिशिल्ड लस मिळणार आहे़
लसीकरण नियोजन
१) १८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरणासाठी आवश्यक असणारी बुकिंग आज रात्री ८ वाजता उपलब्ध केली गेली नाही. लसीकरणासंदर्भात राज्य सरकारकडून निर्देश उशिरा आल्याने उद्याच्या लसीकरणासाठीचे बुकिंग उद्या (बुधवार दि़ १२ मे) सकाळी ८ वाजता करता येईल. परंतु, याकरिता केवळ दोनच लसीकरण केंद्र उपलब्ध राहणार आहे़
२) ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी उद्या एकूण ११८ केंद्र उपलब्ध राहणार आहेत़ यात ११२ केंद्रांवर कोविशील्ड, तर ६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार आहे़
यामध्ये कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस २८ मार्चपूर्वी घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जाणार आहे़ तर, २० टक्के नागरिकांना पहिला डोस अपॉइंटमेंट/स्लॉट बुकिंगनुसार दिला जाणार आहे़ तर कोव्हॅक्सिनचा पहिला डोस १४ एप्रिलपूर्वी घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस डोस दिला जाणार असून, कोव्हॅक्सिनचा पहिला डोस बुधवारी दिला जाणार नसल्याचे महापालिकेने कळविले आहे़