पुणे जिल्ह्यात विकेंड लॅाकडाउन अखेर रद्द करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही माहिती दिली आहे.
टोपे यांच्या उपस्थितीमध्ये आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान महापालिकेचा विरोध असला तरी संस्थात्मक विलगीकरण वाढवावे अशा सुचना टोपेंनी दिल्या आहेत.मात्र यामध्ये ज्यांना गृह विलगीकरण शक्य नाही त्यांचाच समावेश असावा असेही ते म्हणाले आहेत.
“दर आठवल्याप्रमाणे पुण्यातली कोरोना आढाव्याची बैठक होती. अजित पवार दुसऱ्या बैठकीत असल्याने त्यांनी मला या बैठकीला बोलावलं होतं. साताऱ्यात सर्वांधिक केसेस असल्याने तिथे बैठकीला जात आहे.” असं टोपे म्हणाले.
पुण्याबाबत विचारल्यावर “पुण्यात संख्या कमी होते आहे. पण पॅाझिटिव्हिटी कमी होत नाहीये.लॅाकडाउनला पंधरा दिवसाचे एक्सटेन्सन. त्यासाठीची नियमावली १ तारखेला जाहीर करणार. पुण्यातल्या महापौरांनी काही सुचना केल्या आहेत. त्याचा विचार करु. मात्र नेत्यांच्या सुचनेनुसार शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवांबाबतचा लॅाकडाउन रद्द.अत्यावश्यक सेवा सुरु ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. त्या ७ ते ११ मध्येच सुरु रहातील”
यावेळी महाराष्ट्रात ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग शास्त्रीय पद्धतीने केले पाहीजे. ट्रॅकिंग रेट कमी करुन पॅाझिटिव्हिटी करु नका. टेस्टींग कमी होता कामा नये. अशा सुचना देखील दिल्याचे टोपेंनी सांगितले.
“ पुण्यात ८०% होम आयसोलेशन होत्या. त्या आता ५६% पर्यंत आल्या आहेत. त्या आणखी कमी करण्याच्या सुचना.इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन वाढले पाहीजे. ग्रामीण लोकांना तालुक्याच्या सीसीसी मध्ये आणले पाहीजेत. आवश्यक्ता असल्यास नवीन केंद्र सुरु करुन त्यांना आणा. त्यातुन त्यांचे विलगीकरण होईल. तसेच चेकींग पण होणार त्यामुळे ते फायदेशीर “असे टोपे म्हणाले.
हे संस्थात्मक विलगीकरण फक्त ज्यांना गृह विलगीकरण शक्य नाही त्यांच्या साठीच असल्याचेही टोपेंनी स्पष्ट केले