चाकण औद्योगिक वसाहतीमधील वासुली फाटा येथे मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी आठवड्यातील दर रविवारी मोठे बाजारभाव भरतो असतो. येथील आठवडे बाजारात हजारो ग्राहक विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी येतात. यामध्ये एमआयडीसीत काम करणारे कामगारांची संख्या जास्त आहे.सध्या खेड तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.येथील बाजार येणारे अनेक लोक तोंडाला मास्क लावत नाहीत.यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
यामुळे भांबोली ग्रामपंचायतने दवाखाने व मेडिकल व अत्यावश्यक सेवा वगळता रविवारी दि. २८ ला एक दिवस भरणारा आठवडे तरकारी बाजारासह इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे.तरी कोरोना आजाराला दूर ठेवण्यासाठी सर्वांनी ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देऊन सहकार्य करावे.ग्रामपंचायतने आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सरपंच भरत लांडगे,ग्रामसेवक काकासाहेब मिंड यांनी दिली आहे.