आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात असणाऱ्या भीमाशंकर, पाटण व आहुपे खोऱ्यामध्ये तळेघर येथील एकमेव आठवडे बाजार आहे. त्यामुळे या तीनही खोऱ्यातील आदिवासी बांधवांनी होळी या सणानिमित्त खरेदी करण्यासाठी लगबग असते. तळेघर येथे बाजारासाठी विविध ठिकाणाहून व्यापारी आदल्या दिवशीच रात्री मुक्कामी येत असतात. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे बाजार भरला नाही.
आदिवासी भागामध्ये होळीच्या बाजाराला पारंपारिक भाषेमध्ये ‘शिमग्याचा बाजार’ असे म्हणतात. बारा महिन्यांतील बैलपोळा व होळी या दोन सणांसाठी होणाऱ्या आठवडे बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते.
--
अनेक वर्षांची परंपरा खंडित
भीमाशंकर पाटण व आहुपे त्याचप्रमाणे कोकणातील व जुन्नर, खेड तालुक्यातील अनेक नागरिक तळेघर येथील होळीच्या आठवडे बाजारामध्ये गुळ, डाळ, खोबरे, लाल मिरच्या तेलाचे डबे खरेदी करण्यासाठी येत असतात. या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणी बांधव हे आपल्या भागात पिकणारे कडधान्य सिडीघाट व बैल घाटाने डोक्यावर घेऊन येतात. आपले कडधान्य व्यापाऱ्यांना देऊन या मोबदल्यात लाल मिरच्या, गोडतेल डबे व इतर साहित्य खरेदी करतात, ही देवान घेवानची प्रथा गेले कित्येक वर्षांपासून आजतागायत टिकून आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी भागातील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
--
फोटो ई-मेल केला आहे.
फोटो खालील मजकूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेला तळेघर (आंबेगाव) येथील आठवडे बाजार.
( छायाचिञ संतोष जाधव )
तळेघर वार्ताहार,
संतोष जाधव,