या वेळी संस्थेचे सचिव मुकुंद शहा, सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, खजिनदार ॲड. मनोहर चौधरी, संचालक तुकाराम जाधव, पराग जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे या वेळी उपस्थित होते.
इंदापूर महाविद्यालय नावीन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम राबवित असते. महाविद्यालयामध्ये ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली आहे. आतापर्यंत 5 हजार 8 बेल व देशी रोपांचे वाटप केले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचे स्वागत रोपटे देऊन करण्यात आले. एकूण २०० पेक्षा जास्त उमेदवारांना वेगवेगळ्या देशी जातीच्या वृक्षांच्या रोपाचे वाटप केले. यामध्ये बेल, भेंडी, वड, पिंपळ, जाई, जुई, मोगरा, कन्हेर, काटेसावर कडूनिंब या व अशा वृक्षांचा समावेश होता.
१३ बारामती इंदापूर महाविद्यालय
इंदापूर महाविद्यालयामध्ये मुलाखतीस आलेल्या उमेदवारांना रोपटे भेट देताना हर्षवर्धन पाटील.