श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एस्टी बसने आषाढी एकादशीला गेला होता. हा पालखी सोहळ्याचा शनिवारी परतीचा प्रवास झाला. त्या वेळी गावागावांत भाविकांनी माऊलींच्या बसचे जल्लोषात स्वागत केले.
सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीच्या काठावरील नीरा शहरात भाविकांनी व प्रशासनाच्या वतीने माऊलींच्या बसचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे संतांच्या पायी पालखी सोहळ्याला शासनाने मज्जाव घातला आहे. मात्र चलपादुका एसटी बसमधून पांडुरंगाच्या दर्शनासाठी नेल्या जात आहेत. शनिवारी माऊलींच्या चलपादुका परतीच्या प्रवास करत होत्या. पुणे जिल्ह्यात नीरेकर ग्रामस्थांनी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान माऊली माऊलींच्या गजरात स्वागत केले.
जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, उपनिरीक्षक कैलास गोतपागर, सुरेश गायकवाड, महादेव कुतवळ, संदीप मोकाशी, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
---
फोटो क्रमांक : २४ नीरा माऊली पालखी स्वागत
फोटोओळ : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुका घेऊन जाणाऱ्या एसटी बसचे नीराकरांनी उत्स्फूर्तपणे माऊली माऊलीच्या गजरात स्वागत केले. (छाया भरत निगडे)
240721\24pun_6_24072021_6.jpg
फोटोओळ : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चल पादुका घेऊन जाणाऱ्या एस्टी बसचे नीरेकरांनी उतस्फुर्तपणे माऊली माऊलीच्या गजरात स्वागत केले. (छाया भरत निगडे)