पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून कधी होणार, कधी तुटणार अशी चर्चा होत असलेल्या भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांची युती अखेर आज झाली. मुंबईत युतीबाबत घोषणा झाल्यानंतर, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ‘लोकमत’कडे प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दोन्ही पक्षांमधील वादावादी संपल्याबद्दल आनंद व्यक्तकरीत मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.विरोधकांचा पालापाचोळापिक्चरमध्ये चित्र, नाटकामध्ये पात्र आणि राजकारणात मित्र कधीही शाश्वत नसतात़ त्यामुळे जनतेची भावना लक्षात घेऊन ही युती झाली आहे़ शिवसेना-भाजपा युतीमुळे आता पुन्हा विरोधकांचा पालापाचोळा होणार आहे़- महादेव बाबर, माजी आमदारयुती तुटावी वाटणाऱ्यांना चपराकयुतीचा निर्णय घेऊन भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांनी ती होऊ नये यासाठी प्रयत्न करणाºयांना चपराक दिली आहे. २५ वर्षांपूर्वी युती झाली आणि राज्यातील पारंपरिक घराण्यांची सत्ता धोक्यात आली. आता पुन्हा तसे होऊ नये यासाठी त्यांचाच प्रयत्न चालला होता. मात्र, सुदैवाने तसे झाले नाही. भाजपाचीच नाही तर शिवसेनेचीही शक्ती यातून वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीत ते दिसेलच. सामान्य कार्यकर्त्यांना युती व्हावी असेच वाटत होते.- शाम सातपुते, माजी विरोधी पक्षनेते.दोघांच्या कार्यकर्त्यांची स्वप्नपूर्तीदोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची युती व्हावी अशी मनापासूनची इच्छा होती. ती फळाला आली. दोन्ही पक्षांची शक्ती वाढणार आहे. विधानसभेवर काय परिणाम होईल हा लांबचा प्रश्न झाला, आत्ता लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची शक्ती वाढणार आहे. शिवसेना टीका करत होती, पण त्यात्या वेळच्या गोष्टी असतात. त्यांनी टीका केली म्हणून आमचा मतदार डिस्टर्ब होईल या शंकेला काही अर्थ नाही. हिंदुत्व या व्यापक मुद्द्यावर ही युती झाली आहे. युतीचा लोकसभा व विधानसभेवरचा विजय पक्का आहे.- गिरीश बापट, पालकमंत्रीयुतीमुळे फायदा होणारभाजपाने शिवसेनेसमोर नेहमीच सहकार्याचा हात पुढे केला होता. त्यांच्या टीकेचे आम्हाला काही वाटत नव्हते. राजकारणात काही गोष्टी दुर्लक्षित कराव्या लागतात. एका विचाराचे व एका ध्येयाचे दोन पक्ष एकत्र आले ही आनंदाची गोष्ट आहे. वैयक्तिक मलाही आनंद झाला आहे. भाजपाच्या शहर शाखेच्या वतीने अध्यक्ष म्हणून मी या युतीचे स्वागत करतो. विधानसभेला काय करणार, हा प्रश्न आत्ताच करण्यात अर्थ नाही. वरिष्ठस्तरावर त्याबाबत निर्णय होईल. दोन्ही पक्षांत याविषयी चर्चा सुरू आहे, अशी माझी माहिती आहे. वेगळे लढून तोटाच झाला असता, एकत्र आल्यामुळे फायदा होणार, हे नक्की आहे.- योगेश गोगावले, शहराध्यक्ष भाजपा.हिंदूत्ववादी मते एकसंधराहण्यासाठी निर्णयसेना-भाजपा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र पक्ष म्हणून राज्यात काम करत आहेत. सन २०१४ निवडणुकीत देखील दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढविल्या. परंतु विधानसभा निवडणुकीत सत्तेचे राजकारण बदलल्याने सेना-भाजपा युतीमध्ये दुरावा निर्माण झाला. परंतु सध्याचे देशातील राजकीय वातावरण लक्षात घेऊन भाजपाकडून वारंवार युती करण्याचा प्रस्ताव पक्षाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याकडे येत होता. उध्दव ठाकरे यांनी युतीचा निर्णय घेताना आमचे विचार, महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांबाबत कोणतही तडजोड केली नाही.-नीलम गोºहे, आमदार, शिवसेनायुती झाल्याचा आनंदभाजपा-शिवसेनेची युती झाल्याचा आनंद झाला. २०२२ पर्यंत आपला भारत विकसित करण्याचे, श्रेष्ठ, समर्थ भारत करण्याचा संकल्प पूर्ण होण्यासाठी ही घटना म्हणजे शुभलक्षणच. महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या जनतेची इच्छा पूर्ण झाली आहे. - अनिल शिरोळे, खासदार
मैत्रीचे नवे पर्व, युतीचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 2:01 AM