शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

शिवनेरी ते पुरंदर पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 12:26 AM

छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने, जय जय जय जय शिवाजी अशा आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या घोषणांनी आज मंचर शहर निनादून गेले.

मंचर : छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने, जय जय जय जय शिवाजी अशा आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या घोषणांनी आज मंचर शहर निनादून गेले. निमित्त होते ते स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य आयोजित किल्ले शिवनेरी ते किल्ले पुरंदर पालखी सोहळ्याच्या मंचर शहरातील आगमनाचे.

दुपारी कळंब येथे पालखीचे स्वागत सभापती उषा कानडे, माजी सभापती वसंतराव भालेराव, सरपंच राजश्री भालेराव, मनीषा कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. मंचर शहरात पालखीची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरपंच दत्ता गांजाळे यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, अरुण गिरे, सुरेश भोर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कैलास बाणखेले, अरुण नाना बाणखेले, बाजीराव मोरडे, महेश थोरात, दिलीप पवळे, बाबाजी चासकर, बाबु थोरात, गणेश बाणखेले, रंगनाथ थोरात , संदिप शेवाळे आदींसह नागरीक मोठ्या संख्येने स्वागताला उपस्थित होते.शिवचरित्र व शंभुचरित्र कथाकार ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर यांच्या संकल्पनेतून स्वराज्य संघ महाराष्टÑ राज्य यांच्या वतीने किल्ले शिवनेरी ते किल्ले पुरंदर छत्रपती शिवाजीराजे-शंभूराजे भेट पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. किल्ले शिवनेरी येथून पालखीचे प्रस्थान होते. मंचर येथे पालखीची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी तुतारीधारी अग्रभागी होते. पारंपरिक वेशातील मावळे आणि युवकांचा जल्लोष अशा वातावरणात मिरवणूक पार पडल्यानंतर पालखी पुन्हा पुरंदरकडे मार्गस्थ झाली.

टॅग्स :Puneपुणे