लोकमत न्यूज नेटवर्कदेहूरोड : येथील शस्रास्र (आयुध) निर्माणीतील सर्व कामगार संघटनांच्या वतीने सर्व दिंड्यांचे स्वागत करून वारकऱ्यांना मिठाई व फराळाचे बंद पुडे देण्यात आले. ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढून स्वच्छ व निर्मल वारीचा प्रचार केला. मामुर्डी येथील लायन्स क्लबच्या शाळेतील स्काऊट-गाईडच्या पन्नास विद्यार्थी व शिक्षकांनी पालखी मार्गावर स्वच्छता केली. चिंचोली ते देहूरोड दरम्यान लष्कराचे विविध विभाग व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने पिण्याच्या पाण्याही व्यवस्था करण्यात आली होती. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने ठिकठिकाणी कचरा टाकण्यासाठी घंटागाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. चिंचोलीत युवकांनी सरबत व फराळाची व्यवस्था केली होती. देहूरोड येथे अमरदेवी नागरी पतसंस्था, विनायका नागरी पतसंस्थांनी अन्नदान केले. देहूफाटा येथे राजे शिवछत्रपती मराठा सोसायटीच्या वतीने दिंडी प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. शिवछत्रपती तरुण मित्र मंडळ (किवळे), स्वरसाधना संगीत विद्यालय, लायन्स क्लब हवेली, आर्ट आॅफ लिव्हिंग, विकासनगर ज्येष्ठ नागरिक संघ, साऊथ इंडिया असोसिएशन, श्री श्री शिवयोगी चंद्रशेखरमहाराज सेवा संघ, एमईएस व डीएडी डेपो कामगारांच्या वतीने फराळ व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
मिठाई, फराळाने वारकऱ्यांचे स्वागत
By admin | Published: June 19, 2017 5:30 AM