शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

संत सोपानकाकांचा पालखी सोहळ्याचे नीरानगरीत भक्तिमय वातावरणात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 12:47 PM

नीरेतील ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत केले....

नीरा : संत सोपानकाकांचा पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातील शेवटचा मुक्काम मांडकी येथे घेऊन जेऊर, पिंपरे (खुर्द) मार्गे नीरा शहरात विसावला. अहिल्याबाई होळकर चौकात रथातून पालखी खांद्यावर घेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. नीरेतील ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत केले.

आज सोमवारी सकाळी पुरंदर तालुक्यातील बागायती गाव म्हणून ओळख असलेल्या मांडकी गावचा मुक्काम आटपून, जेऊर मार्गे पिंपरे (खुर्द) येथे सकाळच्या न्याहरीसाठी विसावला. जेऊर येथे ग्रामपंचायतीचे सरपंच स्वाती शिरसट, उपसरपंच माऊली धुमाळ, सोमेश्वरचे संचालक अनंता तांबे, पोलीस पाटील कुंडलिक तांबे, शामराव धुमाळ यांनी सकाळी सातच्या सुमारास पालखीचे स्वागत केले.

पिंपरे खुर्दचे सरपंच उत्तम थोपटे, पोलीस पाटील सोसायटीचे चेअरमन विलास थोपटे, यांसह ग्रामस्थांनी सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत केले. नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील शिवाजी चौकात पालखी रथाचे आगमन साडेअकराच्या सुमारास झाले.

यावेळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरण अल्हाददायक झाले होते. सोहळ्याच्या स्वागतासाठी सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, भैय्यासाहेब खाटपे ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, अभिषेक भालेराव, अनंता शिंद, संदिप धायगुडे, ऍड. मुकुंद ननवरे, अँड. आदेश गिरमे, राजेश चव्हाण, चंदरराव धायगुडे, कल्याण जेधे, ग्रामसेवक मनोज डेरे, तलाठी सुनील पाटोळे यांनसह भाविक ग्रामस्थ उपस्थित होते. 

आहिल्यादेवी होळकर चौकात रथातून  पालखी उत्साही भाविकांनी खांद्यावर घेऊन विठ्ठल मंदिरात ठेवली. दुपारच्या या विसाव्याच्या काळात परिसरातील नागरिकांनी रांगालावुन पालखीतील सोपानकांच्या पादुकांचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले. दरवर्षी सोपानकाकांच्या या पालखी  सोहळ्यात दिंड्यांचे प्रमाण वाढते आहे. या वर्षी सोहळ्यात ६ दिंड्याची वाढ झाली असून आता १०२ दिंड्या सहभागी झालेल्या आहेत. 

संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा विसावल्यानंतर सोहळ्यातील भाविकांना ग्रामस्थांच्या वतीने विठ्ठल मंदिर सभागृहात अन्नदान करण्यात आले. दुपारी अडिच वाजता पालखी सोहळ्याचे बारामती तालुक्यातील निंबुत येथील मुक्कामासाठी  प्रस्थान होणार आहे.

मांडकी ते जेऊर दरम्यानच्या ओढ्यावर नव्याने पुल बांधण्यात आला आहे. सहा महिण्यात या पुलाचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. या पुलावरून संत सोपानकाकांच्या पालखी रथा नेऊन या पुलाचे आज उद्घाटन करण्यात आले.

- त्रिगुण गोसावी (मुख विश्वस्त, तथा सोहळा प्रमुख श्री. संत सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्ट, सासवड)

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022