नेरे : ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व अभ्यासात नवचैतन्य येण्यासाठी शाळांमध्ये विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम पार पाडला जातो. त्यालाच स्रेहसंमेलन म्हणतात,’ असे मत रोटरी क्लब भोरचे माजी अध्यक्ष विनय कुलकर्णी यांनी व्यक्त केले़जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरोडी खुर्द येथे वार्षिक स्रेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले, त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. एसटी कामगार संघटनेचे नेते दिलीप वरे यांच्या हस्ते श्रीफल वाढवून स्रेहसंमलनाचे उद्घाटन करण्यात आले़ या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेत बीट व तालुका पातळीवरील यशस्वी सिद्धेश नामदेव वरे व आशिष विजय वरे या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देउन सन्मानित करण्यात आले. तसेच, रोटरी क्लब भोर यांच्याकडून देण्यात आलेल्या ई-लर्निंग प्रोजेक्टचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र वरे यांच्या हस्ते करण्यात आले़ रोटरियन अध्यक्ष जयवंत जाधव, श्रीकांत निकम, डॉ़ आनंदा कंक, वीसगाव खोऱ्यातील प्रसिद्ध छायाचित्रकार संतोष म्हस्के तसेच श्रीकृष्ण वरे, जयवंत वरे, माऊली वरे, श्याम वरे, बाळासाहेब वरे, युवा कार्यकर्ते नितीन वरे, मुख्याध्यापक संजय पवार, सहशिक्षक साहेबराव तांगडे, अनिल महांगरे, माधुरी घाटे, हरिभाऊ महांगरे उपस्थित होते़
कलागुणांसाठी स्नेहसंमेलन सर्वोत्तम मंच : कुलकर्णी
By admin | Published: February 16, 2017 2:53 AM