पुणे: गेल्या सात-आठ वर्षांपासून न्यायालयांच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत बंद होती. परंतू राज्य शासनाच्या प्रयत्नामुळे अखेर न्यायालयाने बैलगाडा शर्यतला परवानगी दिली. न्यायालयाच्या निर्णयाचा जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक पुणे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाबुराव आप्पा वायकर यांनी आपल्या गोठ्यातील गाडा बैलांची वडगाव मावळ येथे मुख्य बाजारपेठेतून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली तसेच सर्व बैलगाडा शौकीन यांना लाडू भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गाडामालक, बैलगाडा शौकीन, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने अति महत्वाचा निर्णय शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा असणारा बैलगाडी शर्यत ही गेल्या सात आठ वर्षापासून काही लोकांच्या वाईट धोरणांमुळे बंद झाल्या होत्या. परंतु गुरूवारी बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशानुसार उठवण्यात आली आहे. जिल्ह्यातील हजारो शेतक-यांसाठी हा अति महत्वाचा निर्णय आहे.- बाबुराव आप्पा वायकर, जिल्हा परिषद कृषी सभापती