पुणे : सध्या महापालिकेच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे, विविध पक्षांच्या प्रचाराने शहरातील वातावरण ढवळून निघत असून, पुरुषांबरोवर महिला उमेदवारांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्यामुळे यंदा सर्वच पक्षांनी प्रत्येक प्रभागामध्ये महिलांना संधी दिली आहे. त्यामुळे महिला मतदारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. ज्यांच्या हातात सत्ता देऊ त्यांनी प्रभागातील नागरी समस्या सोडविण्यावर भर देण्याबरोबरच ‘तो’ किंवा ‘ती’ किमान शिक्षित असावी, अशी मतदारांची अपेक्षा असते. यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांच्या शिक्षणाचा आढावा घेतला असता निश्चितच आशादायी चित्र पाहायला मिळात आहे. निवडणुकीत अंदाजे एकूण महिला उमेदवारांपैकी जवळपास १४१ महिला सुशिक्षित आहेत. त्यामध्ये ६२ महिला पदवीधर, २९ महिला उच्च पदवीधर तर बारावी पास महिलांचे प्रमाण ५० इतके असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)समस्यांचे निराकरण करण्याची जाण-कोणतेही प्रश्न हातोटीने मांडण्यासाठी विषयांची मूलभूत जाण हवी आणि त्यासाठी तो किंवा ती किमान शिक्षित असावा अशी मतदारांची लोकप्रतिनिधींकडून माफक अपेक्षा असते. यंदा या कसोटीवर महिला खऱ्या उतरल्या आहेत. निवडणुकीत सुशिक्षित महिलांचेच प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. घरातील बाई शिकली की सगळे कुटुंबच शिक्षित होते, असे म्हणतात. त्याचप्रमाणे महिला नगरसेवक शिक्षित असेल तर तिला नागरिकांच्या प्रश्नांचे आकलन होऊन त्याचे निराकरण कशा पद्धतीने करायचे याची जाण येते.1-शिक्षण असेल तरच हे घडू असू शकते. एखाद्या विषयाकडे संवेदनशीलपणे पाहाण्याची वृत्ती महिलांमध्ये अधिक असल्याने मतदारराजाकडून महिलांना निवडून देण्याचे प्रमाण वाढत आहे, हे नक्कीच स्वागतार्ह पाऊल ठरत आहे. पूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच महिला राजकारणात होत्या.2-आज ‘चूल आणि मूल’ची चौकट ओलांडून यंदाच्या निवडणुकीत जवळपास १०६ गृहिणी निवडणुकीच्या रिंगणात पुरुष उमेदवारांना टक्कर द्यायला उतरल्या आहेत. पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून ५१ महिला उमेदवार व्यवसाय आणि व्यापार क्षेत्रात कार्यरत आहेत, ही नक्कीच सुखावह बाब ठरली आहे.
सुशिक्षित उमेदवारांतही ‘ती’च ठरतेय सरस
By admin | Published: February 15, 2017 2:48 AM