पुणे: रेल्वेचे तिकीट कॅन्सल करण्यासाठी त्यांनी गुगलवर सर्च केले. तिकीट रद्द करण्यासाठी त्यांनी वेबसाइट उघडली; परंतु ती आरआरसीटीसी बेवसाइट सायबर चोरट्यांची असल्याने तिकीट कॅन्सल होण्याऐवजी बँक खात्यातून साडेतीन लाख रुपयांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला. याबाबत औंधमधील एका ६९ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २३ जानेवारी २०२३ रोजी घडला.
याबाबतची माहिती अशी, फिर्यादी यांनी रेल्वेचे तिकीट आयआरसीटीसीवरून बुक केले होते. परंतु त्यानंतर त्यांचा प्रवासाचा बेत रद्द झाला. त्यांनी रेल्वेचे तिकीट कॅन्सल करण्यासाठी मोबाइलवरून गुगलवर सर्च केले. तेव्हा त्यांना आयआरसीटीसीच्या अनेक वेबसाइट आढळून आल्या. त्यापैकी एक साइट त्यांनी उघडली. ती नेमकी सायबर चोरट्यांची होती. त्यांनी साइट उघडताच त्यांना सायबर चोरट्यांचा फोन आला. त्यांची चौकशी त्यांच्याकडून पीएनआयआर नंबर घेतला. त्यांच्या तिकिटांची माहिती सांगितली. त्यानंतर त्यांनी तिकीट कॅन्सल करण्यासाठी एक लिंक पाठवली व ती भरून पाठविण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी फॉर्म भरून पाठविला. तेव्हा त्यांना तुमचे पैसे खात्यात जमा झाले आहेत, तपासून पाहा, असे सांगितले. तेव्हा त्यांनी बँक खाते उघडून पाहिले तर खात्यात पैसे जमा झाले नव्हते. तेव्हा सायबर चोरट्याने त्यांना काही वेळात पैसे जमा होतील, असे सांगितले. तेवढ्यात त्यांना स्टेट बँकेतून फोन आला, तुम्ही १ लाख रुपयांचे व्यवहार केले आहेत का? अशी चौकशी केली. त्यांनी नाही असे सांगितले. तेव्हा बँक कर्मचाऱ्याने हा सायबर फ्रॉड असून तुमचे इंटरनेट बँकिंग बंद करतो. तुम्ही बँकेत तक्रार करा. तोपर्यंत सायबर चोरट्यांनी त्यांच्या ३ खात्यातून ३ लाख ४४ हजार रुपये काढून घेतले. पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामणी अधिक तपास करीत आहेत.
आयआरटीसीटीसारख्या कंपनीसारख्यां वेबसाइट गुगलवर असतील
आयआरटीसीटी यांची एकच वेबसाइट आहे. त्यावरच तिकीट आरक्षित अथवा रद्द करता येते. आयआरटीसीटीकडून कोणताही फोन येत नाही. तसेच ते कोणतीही लिंक पाठवत नाही. तिकीट रद्द केल्यानंतर त्याचे पैसे लगेच येत नाही, तर सात दिवसांच्या कालावधीत तुमच्या खात्यात येतात. आयआरटीसीटीसारख्या कंपन्यांनी त्यांच्या कंपनीसारख्यांनी आपल्यासारख्या वेबसाइट गुगलवर असतील तर त्यावर लक्ष ठेवून त्या काढून टाकल्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून लोकांची फसवणूक होणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.