पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून भन्नाट प्लेक्सबाजी नागरिकांना पाहायला मिळते आहे. कधी शिवडे.. आय एम सॉरी.. तर कधी आपण यांना पाहिलत कां.? , ओ नगरसेवक भाऊ, तुम्हाला कुणीही रागावणार नाही, प्लिज, तुम्ही परत या... यांसारख्या मजकुरांच्या बॅनरने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसर दणाणून सोडला. या प्लेक्सबाजीतून कधी मनोरंजन केले तर कधी राजकीय वातावरणात रंग भरले. सध्या पुणे शहरात पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. याच पाणी प्रश्नावरून पालकमंत्री गिरीश बापट व महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला या गिरीश काय रे.?, दुष्काळ असताना सुध्दा अजितने कधी शहराला पाणी कमी पडू दिले नाही. अशा मजकुराच्या बॅनरमधून लक्ष्य करण्यात आले आहे. शहराच्या पाणी वाटपावरून जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यात मागील काही दिवसांपासून निर्माण झालेल्या वादातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैैरी झाडू लागल्या आहेत. शहरातील विविध भागात हे प्लेक्स लावण्यात आले आहेत. या लक्षवेधी प्लेक्सने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पाणी समस्येचा ढोल वाजवून भाजपाला नामोहरम करण्याची ही खेळी विरोधी पक्षांकडून खेळण्यात आलल्याचे ’खासगी ’त बोलले जात आहे. मात्र, या प्लेक्स खाली एक त्रस्त पुणेकर असा उल्लेख आहे. हे बॅनर कोणी लावले आहेत, या मागे राजकीय पक्षाचा हात आहे का?, हे अद्याप अस्पष्ट आहे. पाणीकपातीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून महापालिका वाढीव लोकसंख्येबाबत आराखडा तयार करत असल्याने पाण्याबाबत आठवडाभरात पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.शहरात पाणीकपात निश्चित असली तरी नेमकी किती टक्के पाणीकपात होणार हे अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. याचधर्तीवर शहरात पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर टीका करणारे प्लेक्स लावण्यात आले आहे. हे बॅनर कोणी लावले आहेत, या मागे राजकीय पक्षाचा हात आहे का?, हे अद्याप अस्पष्ट आहे.
‘त्या’ भन्नाट प्लेक्सबाजीनंतर आता ‘गिरीश काय रे ?' बॅनरचा पुणे शहरात धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 1:35 PM
सध्या पुणे शहरात पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे..
ठळक मुद्देलक्षवेधी प्लेक्सने शहरात राजकीय चर्चांना उधाणया प्लेक्सबाजी मागे राजकीय पक्षाचा हात आहे का?, हे अद्याप अस्पष्ट