शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

काय सांगता, अयोध्येतील राम मंदिरासाठी मावळातील साहित्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 2:01 PM

अयोध्येत साकारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिर परिसरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी वापरण्यात येत असलेले स्ट्रॉम वॉटर ड्रेन मटेरियल मावळातील आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या माध्यमातून पुरवले जात आहे....

तळेगाव दाभाडे (पुणे) : तळेगाव दाभाडेमध्ये पांडवकालीन मंदिर आहे, मावळ प्रांताची इतिहासात नोंद आहे. हे आपणास माहीत आहे. पण, आता मावळ तालुक्याच्या शिरपेचात नवीन तुरा रोवला जाणार आहे. अयोध्येत साकारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिर परिसरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी वापरण्यात येत असलेले स्ट्रॉम वॉटर ड्रेन मटेरियल मावळातील आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या माध्यमातून पुरवले जात आहे.

सुंदर डिझाईन केलेले मटेरियल मावळातील आरएमके इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बनविले जात आहे. या मटेरियलचे तब्बल ८० ते १०० कंटेनर अयोध्येला जाणार असून, हे मटेरियल वापरून ५ ते ६ किलोमीटर लांबीची पावसाळी पाण्याची वाहिनी टाकण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान बॉर्डरवरही हेच मटेरियल पुरवले जात आहे. त्यामुळे अयोध्येतील राममंदिरासाठी मावळ तालुक्याने खारीचा वाटा उचलला आहे.

आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपचे संस्थापक यशस्वी उद्योजक रामदास काकडे व युवा उद्योजक संदीप वनवारी, रणजीत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कंटेनरचे पूजन नवलाख उंब्रे व जाधववाडी ग्रामस्थ व कामगारांच्या हस्ते करून व मिठाई वाटून कंटेनर अयोध्येकडे रवाना करण्यात आला. यावेळी मावळ तालुका जमीन हक्क परिषदेचे तालुकाध्यक्ष दिनकर शेटे, विकास सोसायटी चेअरमन तानाजी पडवळ, संतोष नरवडे, काळूराम जाधव, बळीराम मराठे, अनिल कोतुळकर, रामदास यादव, रवींद्र गोडबोले यांच्यासह नवलाख उंबरे जाधववाडी ग्रामस्थ, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मावळ तालुक्याची ओळख ‘उद्योगनगरी’ अशी आहे. अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राममंदिरासाठी आमच्या आरएमकेमधून स्ट्रॉम वॉटर ड्रेन मटेरियल पाठविण्यात येणार आहे. ही बाब आमच्या कंपनीच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे.

- रामदास काकडे, उद्योजक

टॅग्स :PuneपुणेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर