शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 12:28 PM

शेतकऱ्यांकडून दुधाचे अनुदान न मिळाल्याची तक्रार येताच अजित पवार यांनी सोनाई दूधसंघाला इशारा दिला आणि नंतर त्यावर स्पष्टीकरणही दिलं.

NCP Ajit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी आणि जाहीर सभांमधून केल्या जाणाऱ्या टोलेबाजीसाठी ओळखले जातात. राष्ट्रवादीच्या नुकत्याच झालेल्या जनसन्मान रॅलीतील एका भाषणादरम्यानही अजित पवारांच्या याच शैलीचा प्रत्यय आला. सभेतील शेतकऱ्यांकडून दुधाचे अनुदान न मिळाल्याची तक्रार येताच अजित पवार यांनी सोनाई दूधसंघाला इशारा दिला आणि नंतर त्यावर स्पष्टीकरणही दिलं.

"मला आत्ता चिठ्ठी आली, की जानेवारीपासून दुधाचं अनुदान मिळालेलं नाही. मला त्याबाबात सविस्तर माहिती द्या. तिथं जे अधिकारी होते त्यांची मधल्या काळात बदली झाली असून तिथं नवीन अधिकारी आले आहेत. आम्ही जे अनुदान जाहीर केलंय ते द्यायचं कोणाचंही ठेवणार नाही," असा शब्द अजित पवार यांनी दूध उत्पादकांना दिला. त्यावेळी गर्दीतून एका शेतकऱ्याने सोनाई दूधसंघाची तक्रार केली. त्यावर अजित पवारांनी म्हटलं की, "सोनाईकडे पण बघतो ना, कसं त्यांनी दिलं नाही ते. म्हणजे पैसे का दिले नाहीत ते बघतो. नाहीतर तुम्ही म्हणाल दादा तर दमच द्यायला लागला. दम नाही बाबा आमचा नमस्कार आहे," असं म्हणत अजित पवारांनी हात जोडले आणि उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

दरम्यान, सोनाई दूधसंघाचे प्रमुख असलेले यशवंत माने आणि त्यांचे चिरंजीव प्रवीण माने यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेत त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. तसंच प्रवीण माने हे इंदापूरमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासही इच्छुक आहेत.

दुधाच्या अनुदानाबाबत काय आहे सरकारचा निर्णय?

दुधाचे दर कमी झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारने दुधाला प्रतिलीटर ५ रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी दुधाला प्रतिलिटर ३० रुपये स्थायीभाव आणि शासनाकडून ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारindapur-acइंदापूर